पिंपरी-चिंचवड महानगरपालिका

देशातली सर्वात श्रीमंत असलेली पिंपरी-चिंचवड नगरपालिका(स्थापना१९८२) इ.स. १९८६साली महानगरपालिका झाली. त्यानंतर शहराचे काम पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे चालू लागले. हिचे मुख्यालय पिंपरी येथे आहे.

पिंपरी चिंचवड गावात सामाविष्ट झालेली गावे आणि त्यांच्या ग्राम पंचायती

संपादन
  • आकुर्डी
  • किवळे
  • चऱ्होली
  • चिखली
  • चिंचवड
  • तळवडे
  • ताथवडे
  • थेरगाव
  • दापोडी
  • दिघी
  • निगडी
  • पिंपरी
  • पिंपळे गुरव
  • पुनावळे
  • बोपखेल
  • भोसरी
  • मामुर्डी
  • मोशी
  • रावेत
  • वाकड
  • सांगवी
  • डुडूळगाव

महापौर

संपादन

पिंपरी महापालिकेची पहिली सार्वत्रिक निवडणूक इ.स. १९८६ मध्ये झाली. आतापर्यंतच्या महापौरपदासाठी मराठा समाजाला सर्वाधिक व त्याखालोखाल माळी समाजाला संधी मिळाली. वाघेरे पितापुत्रांनी, तर लांडे पती-पत्‍नींनी हे पद भूषवले आहे. आर.एस. कुमार व बहल हे अमराठी महापौर झाले आहेत. फरांदे पहिल्या महिला महापौर ठरल्या. पवळे यांच्या काळात महापौरपदाचा कालावधी अडीच वर्षांचा झाला. त्यानंतरच्या महापौरांमध्ये मंगला कदम, बहल व मोहिनी लांडे यांना अडीच वर्षांचा कालावधी मिळाला. भिकू वाघेरे व मधुकर पवळे यांचे पदावर असताना निधन झाले. मोहिनी लांडे यांच्या अडीच वर्षांच्या कारकिर्दीनंतर २०१४ च्या महापौरपदासाठी अनुसूचित जमातीचे आरक्षण जाहीर झाले. त्यामुळे २०१४ सालच्या उत्तरार्धात या प्रवर्गातील शकुंतला धराडे यांना पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौर होण्याची संधी मिळाली आहे.

भोसरीतील ज्ञानेश्वर लांडगे यांना पहिल्या महापौरपदाचा मान मिळाला. त्यानंतरचे महापौर:-

  • पिंपरी गावातील भिकू वाघेरे
  • सांगवीतील नानासाहेब शितोळे
  • आकुर्डीतील तात्या कदम
  • पिंपरी-भाटनगरचे कविचंद भाट
  • पिंपळे-सौदागरचे सादबा काटे
  • पिंपळे-निलखचे प्रभाकर साठे
  • बारामतीचे अजित पवार
  • चिंचवडचे आझम पानसरे
  • भोसरीतील विलास लांडे
  • फुगेवाडीचे रंगनाथ फुगे
  • पिंपरीगावातील संजोग वाघेरे
  • प्राधिकरणातील आर.एस. कुमार
  • चिंचवडच्या अनिता फरांदे
  • नेहरूनगरचे हनुमंत भोसले
  • निगडीचे मधुकर पवळे
  • पिंपळे गुरवचे लक्ष्मण जगताप
  • खराळवाडीचे प्रकाश रेवाळे
  • शाहूनगरच्या मंगला कदम
  • नेहरूनगरच्या डॉ. वैशाली घोडेकर
  • चिंचवडच्या अपर्णा डोके
  • संत तुकारामनगरचे योगेश बहल
  • भोसरीतील मोहिनी लांडे
  • शकुंतला धराडे
  • चऱ्होलीतील नितीन काळजे
  • माई ढोरे ,जुनी सांगवी,

आयुक्त राजीव राधव यांनी सादर केलेल्या महापालिकेच्या २०१६-१७ च्या अंदाजपत्रकातील लक्षणीय खर्च

संपादन

महाराष्ट्रामध्ये हरित शहरी परियोजनेची अंमलबजावणी सर्वप्रथम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केले.

  • चिखलीत संतपीठ (खर्च सव्वा कोटी रुपये)
  • पिंपरीत भीमसृष्टी (पावणेदोन कोटी)
  • यशवंतराव चव्हाण रुग्णालयात बहुमजली वाहनतळ (पावणेतीन कोटी)
  • बर्ड व्हॅलीमध्ये लेखर शो (साडेतीन कोटी)
  • बीआरटीमार्गासाठी वातानुकूलित बस खरेदी (दहा कोटी रुपये)
  • ट्राम सेवा (एक कोटी)
  • २४ तास पाणी पुरवठा (चाळीस कोटी)
  • भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्र (चार कोटी रुपये)