पिंजरा (चित्रपट)
मराठी चित्रपट
पिंजरा हा मराठी भाषेतील एक चित्रपट आहे. पिंजरा हा १९७२चा वी. शांताराम दिगदर्शित चित्रपट आहे. या चित्रपटात डॉ. श्रीराम लागू, निळू फुले यांनी मुख्य भूमिका निभावल्या. हा चित्रपट डॉ. श्रीराम लागू यांचा पदार्पणाचा चित्रपट आहे. या चित्रपटात एक मराठी शिक्षक एका तमाशा महिला कलाकाराला सुधारण्याचा प्रयत्न करतो. हा चित्रपट मराठी चित्रपसृष्टीतील प्रथम रंगीत चित्रपट आहे. हा चित्रपट मराठी चित्रपसृष्टीतील मैलाचा दगड मनाला जातो.[१]
पिंजरा | |
---|---|
दिग्दर्शन | वी. शांताराम |
कथा | अनंत माने |
पटकथा | वी. शांताराम[२] |
प्रमुख कलाकार | संध्या , डॉ. श्रीराम लागू , निळू फुले. |
संवाद | शंकर पाटील [२] |
गीते | जगदीश खेबुडकर |
संगीत | राम कदम |
पार्श्वगायन | उषा मंगेशकर, लता मंगेशकर. |
रंगभूषा | सशी साटम.[२] |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित | १९७२ |
अवधी | २ तास ३० मिनिट. |
पुरस्कार |
|
संकेतस्थळ | अधिकृत संकेतस्थळ |
कलाकार
संपादन- डॉ. श्रीराम लागू - मास्तर
- अभिनेत्री संध्या तमाशवाली बाई.
- निळू फुले - तमाशा ऑनर
- वत्सला देशमुख [३]
निर्माण
संपादनव्ही. शांताराम यांनी दिग्दर्शन केलं.
गीते
संपादनया चित्रपटात खालील गाणी आहेत.
- आली ठुमकत नार लचकत नार... ग साजणी
- कशी नशिबानं थट्टाआज मांडली ..
- छबीदार छबी मी तो-यात उभी ..
- तुम्हांवर केली मी मर्जी बहाल..
- दिसला ग बाई दिसला..
- दे रे कान्हा चोळी लुगडी..
- मला इष्काची इंगळी डसली..
- मला लागली कुणाची उचकी..
कथानक
संपादन'पिंजरा' ही एका तत्त्वनिष्ठ व ब्रह्मचारी शिक्षकाची केवळ एका वारांगनेच्या क्षणिक मोहाच्या पिंजऱ्यात अडकून झालेल्या त्याच्या नैतिक, आत्मिक आणि सामाजिक अधःपतनाची कथा आहे.[३]
संदर्भ
संपादन- ^ https://m.timesofindia.com/entertainment/marathi/movies/photofeatures/some-of-the-timeless-marathi-classics-you-should-not-miss/pinjra-1972/photostory/65275728.cms
- ^ a b c "संग्रहित प्रत". 2021-01-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-24 रोजी पाहिले.
- ^ a b "'पिंजरा'ची 46 वर्षे : मास्तर न्हायं तुमच्या हातात तुनतुन दिलं..., हे आहेत गाजलेले संवाद". ३० मार्च २०१८.