सुपर्ण किंवा पिंगट गरुड (शास्त्रीय नाव: Aquila rapax, ॲक़्विला रॅपॅक्स ; इंग्रजी: Tawny Eagle, टॉनी इगल) हा गृध्राद्य कुळातील एक गरुड आहे. तो आफ्रिकेत जवळपास सर्वत्र, व नैर्ऋत्य आशियापासून ते भारतापर्यंत सर्व प्रदेशांत प्रजनन करतो. भारतीय उपखंडात तो बलुचिस्तान, नेपाळ तराई, बंगला देश, उत्तर तमिळनाडू येथे आढळतो.[] तो लाल-ठिपक्यांची, पांढऱ्या रंगाची दोन ते तीन अंडी घालतो.[]

पिंगट गरुड

प्रजातींची उपलब्धता
शास्त्रीय वर्गीकरण
वंश: कणाधारी
जात: पक्षी
वर्ग: ॲक्सिपिट्रीफोर्मेस
कुळ: गृध्राद्य
(Accipitridae, एक्सिपिट्रीडी)

जातकुळी: ॲक़्विला
जीव: अ‍ॅ. रॅपॅक्स
शास्त्रीय नाव
ॲक़्विला रॅपॅक्स
(टेमिंक, १८२८)
ॲक़्विला रॅपॅक्स
इतर नावे

ॲक़्विला रॅपॅक्स रॅपॅक्स
'

Aquila rapax

वर्णन

संपादन

सुपर्ण हा आकारमानाने घारीपेक्षा मोठा व नेपाळी गरुडापेक्षा छोटा असतो. त्याची लांबी ६० ते ७५ सेमी पर्यंत असते. त्याचा रंग गडद उडी ते मातकट बदामी असतो. पाय पिसांनी झाकलेले असतात.

तो अपमार्जक व परभक्षक दोन्ही आहे. ससाणे, घारी व छोट्या शिकारी पक्ष्यांकडे भक्ष्य पाहून उत्तेजित होतो व ते भक्ष्य पळवतो. गिधाडांबरोबर मृत जनावरे देखील खातो परंतु अलीकडील काळात हे दृश्य दुर्मीळ झाले आहे.

संदर्भ व नोंदी

संपादन
  1. ^ बर्डलाइफ इंटरनॅशनल. "ॲक्विला रॅपॅक्स". असुरक्षित प्रजातींची आय.यू.सी.एन. "लाल" यादी. आवृत्ती २०१६-३. २३-०४-२०१७ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: ref=harv (link)
  2. ^ चितमपल्ली,मारुती. पक्षिकोश.
  3. ^ बर्ड्स ऑफ वेस्टर्न घाट्स, कोंकण अँड मलबार - सतीश पांडे