पालघर विधानसभा मतदारसंघ
पालघर विधानसभा मतदारसंघ - १३० हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार, पालघर मतदारसंघात पालघर जिल्ह्याच्या १. डहाणू तालुक्यातील कासा आणि चिंचणी ही महसूल मंडळे आणि २ पालघर तालुक्यातील तारापूर, पालघर ही महसूल मंडळे आणि पालघर नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो. पालघर हा विधानसभा मतदारसंघ पालघर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती - ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]
शिवसेनेचे श्रीनिवास चिंतामण वनगा हे पालघर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]
आमदार
संपादनवर्ष | आमदार[४] | पक्ष | |
---|---|---|---|
२०१९ | श्रीनिवास चिंतामण वनगा | शिवसेना | |
२०१४ | कृष्णा अर्जुन घोडा | शिवसेना | |
२००९ | राजेंद्र धेड्या गावित | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
निवडणूक निकाल
संपादनमहाराष्ट्र विधानसभा निवडणुक २००९ | ||
---|---|---|
पालघर | ||
उमेदवार | पक्ष | मत |
राजेंद्र धेड्या गावित | काँग्रेस | ५५,६६५ |
मनीषा मनोहर निमकर | शिवसेना | ३४,६९४ |
शंकर सखाराम | अपक्ष | ३०,६८३ |
वरखंडे रामा लाल्या | अपक्ष | ४,५६० |
गंगाराम धाकट सुतार | माकप | ३,६७७ |
सुनील बाळू लहानगे | बसपा | १,५४९ |
लल्लू धोडी माकन | अपक्ष | १,१७४ |
संजय जयराम मार्ले | अपक्ष | १,१६३ |
विजयी
संपादनसंदर्भ
संपादन- ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). 2009-02-19 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). १२ October २००९ रोजी पाहिले.
- ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
- ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
- ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".