पारुल परमार

भारतीय पॅरा-बॅडमिंटनपटू


पारुल दलसुखभाई परमार (२० मार्च १९७३,गांधीनगर, गुजरात) ही एक भारतीय पॅरा-बॅडमिंटनपटू आहे. ती मार्च २०२१ मध्ये पॅरा बॅडमिंटनच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर आहे.[१] भारताच्या प्रतिष्ठित अर्जुन पुरस्कार या क्रीडा सन्मानाने तिला गौरविण्यात आले आहे.

पारुल दलसुखभाई परमार
पारुल परमार
वैयक्तिक माहिती
जन्मजात नाव गांधीनगर, गुजरात
पूर्ण नाव पारुल दलसुखभाई परमार
राष्ट्रीयत्व भारतीय
निवासस्थान भारत
जन्मदिनांक २० मार्च, १९७३ (1973-03-20) (वय: ५१)
खेळ
देश भारत
खेळ बॅडमिंटन
कामगिरी व किताब
सर्वोच्च जागतिक मानांकन
वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरी

वैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमी संपादन

पारुलचा जन्म २० मार्च १९७३ रोजी गुजरातमधील गांधीनगर येथे झाला. ती तीन वर्षांची असताना तिला पोलिओचे निदान झाले. त्याच वर्षी असताना ती झोक्यावरून खाली पडली, ज्यामुळे तिचे कॉलरचे हाड आणि उजवा पाय फ्रॅक्चर झाला. त्यातून बरे होण्यासाठी तिला बराच काळ उपचार घ्यावे लागले.[२] डॉक्टरांनी तिला शरीर बळकट करण्यासाठी व्यायाम करण्याचा सल्ला दिला. तिचे वडील राज्यस्तरीय बॅडमिंटनपटू होते आणि ते सरावासाठी स्थानिक बॅडमिंटन क्लबमध्ये जात असत. मग पारुलनेही तिच्या वडिलांसोबत क्लबमध्ये जाण्यास सुरुवात केली आणि खेळामध्ये रस दाखविणे सुरू केले. शेजारच्या मुलांसोबतही ती बॅडमिंटन खेळू लागली. स्थानिक प्रशिक्षक सुरेंद्र पारेख यांनी तिच्या खेळातील विशेष कौशल्याची दखल घेतली आणि तिला अधिक गांभीर्याने खेळायला प्रोत्साहन दिले.[२]

परमार कुटुंबची परिस्थिती अत्यंत साधारण होती, परंतु पारुलने बॅडमिंटनमध्ये निपुण व्हावे, यासाठी तिच्या पालकांनी आणि भावंडांनी सर्वतोपरी मदत केली. अनेकदा ते बॅडमिंटनमधील तिच्या गरजांना स्वतःहून अधिक प्राधान्य देत असत.[२] पारुलने बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली तरी तिला पॅरा बॅडमिंटनसारखा प्रकार असतो, याची बराच काळ माहिती नव्हती. एकदा पॅरा बॅडमिंटन स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात केल्यानंतर तिला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये यश मिळत गेले.

व्यावसायिक यश संपादन

२०१० च्या आशियाई पॅरागेम्समध्ये पारुलने भारतासाठी कांस्य पदक जिंकले. आंतरराष्ट्रीय स्तरावर तिच्या बॅडमिंटन प्रवासाची ही केवळ सुरुवात होती. २०१४ आणि २०१८ मध्ये तिने आशियाई पॅरा गेम्समध्ये सुवर्ण पदके जिंकली. तिच्यासाठी २०१७ हे एक उल्लेखनीय वर्ष ठरले. तिने बी.डब्ल्यू.एफ पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये एकेरी आणि दुहेरी स्पर्धांमध्ये सुवर्ण पदके जिंकली. २५ फेब्रुवारी २०२० च्या क्रमवारीनुसार परमार ही जगातील पहिल्या क्रमांकाची पॅरा बॅडमिंटनपटू होती.

पदके संपादन

  • आशियाई पॅरा गेम्स २०१० मध्ये कांस्य पदक
  • इंचीऑन, दक्षिण कोरिया येथे झालेल्या आशियाई पॅरा गेम्स २०१४ मध्ये सुवर्ण पदक[३]
  • उल्सान, दक्षिण कोरिया येथे २०१७ मध्ये बी.डब्ल्यू.एफ पॅरा बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये एकेरी व दुहेरी स्पर्धेत सुवर्ण पदके[४]
  • बँकॉक, थायलंड येथे २०१८ मध्ये झालेल्या आशियाई पॅरा गेम्स सुवर्ण पदक [५]                               

पुरस्कार संपादन

संदर्भ संपादन

  1. ^ "BWF Para-Badminton - BWF Para Badminton World Rankings - Overview". bwfpara.tournamentsoftware.com. 2021-03-19 रोजी पाहिले.
  2. ^ a b c "BBC News मराठी".
  3. ^ a b Oct 30, Shweta Singh / TNN /; 2014; Ist, 14:38. "Parul Parmar's efforts does country proud | Badminton News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-03-19 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
  4. ^ Nov 26, M. Ratnakar / TNN /; 2017; Ist, 21:05. "Parul Parmar wins two gold in Para World Championships | Badminton News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2021-03-19 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)
  5. ^ Banerjee, Sudeshna (2018-07-29). "Thailand Para-Badminton International 2018: Parul Parmar wins title; Pramod Bhagat beats Manoj Sarkar in final". www.sportskeeda.com (इंग्रजी भाषेत). 2021-03-19 रोजी पाहिले.