पारिजातक

(पारीजातक या पानावरून पुनर्निर्देशित)

पारिजात किंवा पारिजातक किंवा " प्राजक्त" ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.

पारिजातक किंवा प्राजक्त
पारिजातक
पारिजातक
शास्त्रीय वर्गीकरण
जातकुळी: Nyctanthes
जीव: N. arbor-tristis
शास्त्रीय नाव
Nyctanthes arbor-tristis
  • संस्कृत- पारिजात
  • हिंदी- पारिजात, शेफाली, हरसिंगार
  • बंगाली-
  • गुजराती-
  • मळ्यालम-
  • तामिळ-
  • तेलगु-
  • इंग्रजी- Night-flowering Jasmine
  • लॅटीन- Nyctanthes arbor-tristis
पारिजातकाची पाने

वर्णन

संपादन

पारिजात ही भारतात उगवणारी एक औषधी झाड आहे. ह्याच्या फुलांचा सुगंध मनमोहक आहे. या फुलांना हरसिंगार, शेफालिका, नालकुंकुमा, रागपुष्पी, खरपत्रक, अशी अनेक नावे आहेत. या फुलांना कोरल जास्मीन, नाईट जास्मीन या नावांबरोबरच त्याच्या रात्री गळणाऱ्या पांढऱ्याशुभ्र फुलामुळे ‘ट्री ऑफ सॉरो’ असेही नाव आहे. याचे शास्त्रीय नाव ‘निक्टॅन्थस आर्बोर ट्रीस्टिस’ आहे. हा वृक्ष जास्त प्रमाणात हिमालयाच्या पायथ्याशी आढळणारा तसेच इतरत्रही नैसर्गिकरीत्या उगवणारा हा पारिजात "प्राजक्त" म्हणूनही ओळखला जातो. आता मात्र तो उपवनात तसेच घरच्या बागेतही हौसेने लावला जातो. याच्या फांद्या पाच-सात मीटर उंच, चौकोनी आणि खरखरीत असतात. त्यावर समोरासमोर येणारी तळव्या एवढी मोठी, काळपट हिरवी, दंतूर कडांची पानेही खरखरीत असतात. याचे पानावर टोकाकडून देठाकडे बोट फिरविल्यावर, त्यावर काटे असल्याचा भास होतो. या पानांचा उपयोग प्राचीन काळी जखमांच्या उंचावलेल्या कडा घासण्यासाठी केला जात असे.

आढळणारा प्रदेश

संपादन

उपयोग

संपादन

या झाडाची ४-५ 'हिरवी' पाने घेऊन त्याची चटणी करून त्याला २०० मिली पाण्यात टाकून ते पाणी ५० मिली (१/४ काढा) राहेपर्यंत उकळावे. हे पाणी शरीराच्या जोडांचे दुखण्यावर प्रभावशाली आहे. या पाण्याचे सकाळी काहीही न खातापिता सेवन केले असता, शरीराच्या जोडांचे दुखणे कमी होण्यास मदत होते चिकुनगुनिया मुळे उद्भवणाऱ्या सांधेदुखीवर तसेच गुडघेदुखीवर (आर्थरायटिस) देखील याचा उपयोग होतो.मलेरियागृध्रसी (सायटिका) या रोगांवरदेखील हे उपयोगी आहे.[]

'बहरला पारिजात दारी, फुले कां पडती शेजारी' हे एक मराठी नाटकातील गाणे आहे. पारिजातकाचे झाड स्वर्गातून कृष्णाने पृथ्वीवर आणले. हे झाड कोठे लावावे यावरून सत्यभामा आणि रूक्मिणी यांच्यात वाद झाला. कृष्णाने ते सत्यभामाच्या अंगणी अशा ठिकाणी लावले की फुले उमलल्यावर रुक्मिणीच्या अंगणात पडावे. पारिजातकाच्या फुलांचा रंग हा पाकळ्या पांढऱ्याशुभ्र रंगाच्या मात्र देठ आणि पाकळीची मधली बाजु ही भगव्या म्हणजेच Orange रंगाची असते.

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ आणि नोंदी

संपादन
  1. ^ बिंबिमा.कॉम हे संकेतस्थळ (इंग्रजी मजकूर) Medicinal use of Harsingar(Night jasmine)/Direction for uses Check |दुवा= value (सहाय्य). दि. १३/०३/२०१७ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)