पाराना नदी
पाराना नदी (स्पॅनिश: Río Paraná, पोर्तुगीज: Rio Paraná) ही दक्षिण अमेरिका खंडामधील एक प्रमुख नदी आहे. ब्राझील, आर्जेन्टिना व पेराग्वे देशांमधून वाहणारी व ४८८० किमी लांबीची पाराना ही ॲमेझॉनखालोखाल दक्षिण अमेरिकेतील दुसऱ्या क्रमांकाच्या लांबीची नदी आहे. ही नदी ब्राझीलच्या दक्षिण भागात दोन नद्यांच्या संगमातून सुरू होते. ब्राझील-पेराग्वे तसेच पेराग्वे-आर्जेन्टिना ह्या देशांच्या सीमा पारानावरून आखण्यात आल्या आहेत.
पाराना | |
---|---|
पाराना नदीमधून प्रवास करणारे एक मालवाहू जहाज | |
पाराना नदीच्या मार्गाचा नकाशा | |
उगम | पारानैबा व रियो ग्रांदे नद्यांचा संगम |
मुख | रियो दे ला प्लाता |
पाणलोट क्षेत्रामधील देश | आर्जेन्टिना, ब्राझील, पेराग्वे |
लांबी | ४,८८० किमी (३,०३० मैल) |
सरासरी प्रवाह | १७,२९० घन मी/से (६,११,००० घन फूट/से) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | २५,८२,६७२ चौरस किमी |
इताइपू धरण हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे धरण पेराग्वेमध्ये पारानावरच बांधले गेले आहे. पेराग्वे नदी ही पारानाची सर्वात मोठी उपनदी आहे. आर्जेन्टिनाच्या उत्तर भागात पाराना व उरुग्वे ह्या दोन नद्यांच्या संगमामधून रियो देला प्लाताची निर्मिती होते. रियो देला प्लाता सुमारे २०० किमी वाहून अटलांटिक महासागराला मिळते.
बाह्य दुवे
संपादन- नकाशा Archived 2004-10-27 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |