उरुग्वे नदी
उरुग्वे (स्पॅनिश: Río Uruguay; पोर्तुगीज: Rio Uruguai) ही दक्षिण अमेरिका खंडामधील एक नदी आहे. ही नदी आग्नेय ब्राझीलमध्ये उगम पावते व दक्षिणेकडे १,८३८ किमी वाहत जाऊन रियो देला प्लाता ह्या मोठ्या नदीला मिळते.
उरुग्वे नदी | |
---|---|
उरुग्वे नदीवरील मोकोना धबधबा | |
उरुग्वे नदीच्या मार्गाचा नकाशा | |
उगम | सेरा दो मार |
मुख | रियो दे ला प्लाता |
पाणलोट क्षेत्रामधील देश | ब्राझील, आर्जेन्टिना, उरुग्वे |
लांबी | १,८३८ किमी (१,१४२ मैल) |
सरासरी प्रवाह | ५,५०० घन मी/से (१,९०,००० घन फूट/से) |
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ | ३,६५,००० |
उरुग्वे नदीने ब्राझील, आर्जेन्टिना व उरुग्वे ह्या देशांच्या सीमा आखल्या आहेत. साल्तो हे उरुग्वेमधील दुसऱ्या क्रमांकाचे शहर ह्याच नदीच्या काठावर वसले आहे.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत