पापुआ न्यू गिनी क्रिकेट संघाचा ओमान दौरा, २०२१-२२
पापुआ न्यू गिनी क्रिकेट संघ सप्टेंबर २०२१ मध्ये ओमानमध्ये झालेल्या २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन स्पर्धेच्या तिरंगी मालिकांसाठी आला होता. तिरंगी मालिकांच्या आधी पापुआ न्यू गिनीने ओमानमध्येच अमेरिकेसोबत दोन आणि नेपाळसोबत दोन असे एकूण चार आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने (वनडे) खेळले.
पापुआ न्यू गिनी वि. अमेरिका
संपादनपापुआ न्यू गिनी क्रिकेट संघाचा ओमान दौरा, २०२१-२२ | |||||
अमेरिका | पापुआ न्यू गिनी | ||||
तारीख | ६ – ९ सप्टेंबर २०२१ | ||||
संघनायक | सौरभ नेत्रावळकर | आसाद वल्ला | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | अमेरिका संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | जस्करन मल्होत्रा (१७६) | आसाद वल्ला (६१) | |||
सर्वाधिक बळी | निसर्ग पटेल (५) | डेमियन रावू (३) |
पापुआ न्यू गिनीने प्रथम एक सामना अमेरिकेशी खेळला. त्यानंतर लगेच दुसरा सामना नेपाळशी खेळला. दोन्ही देशांशी खेळले गेलेले सामने हे आळीपाळीने खेळले गेले. अमेरिकेने पहिला एकदिवसीय सामना जिंकत मालिकेत आघाडी घेतली. दुसऱ्या सामन्यात अमेरिकेच्या जस्करन मल्होत्राने एका षटकात सहा षटकार ठोकले. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात असा विक्रम करणारा तो दक्षिण आफ्रिकेच्या हर्शल गिब्सनंतर दुसरा क्रिकेट खेळाडू ठरला. अमेरिकेने दुसऱ्या सामन्यात १३४ धावांनी विजय मिळवत मालिका २-० ने जिंकली.
१ला सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : पापुआ न्यू गिनी, फलंदाजी.
- अमेरिका आणि पापुआ न्यू गिनी या दोन्ही देशांनी ओमानमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- सुशांत मोदानी आणि गजानंद सिंग (अ) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : पापुआ न्यू गिनी, क्षेत्ररक्षण.
- अभिषेक पराडकर (अ) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
पापुआ न्यू गिनी वि. नेपाळ
संपादनपापुआ न्यू गिनी क्रिकेट संघाचा ओमान दौरा, २०२१-२२ | |||||
नेपाळ | पापुआ न्यू गिनी | ||||
तारीख | ७ – १० सप्टेंबर २०२१ | ||||
संघनायक | ग्यानेंद्र मल्ल | आसाद वल्ला | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | नेपाळ संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | रोहित कुमार (१२७) | चार्ल्स अमिनी (३९) | |||
सर्वाधिक बळी | संदीप लामिछाने (१०) | चॅड सोपर (५) |
पापुआ न्यू गिनीने नेपाळबरोबरचे सामने ७ आणि १० सप्टेंबर रोजी खेळले. नेपाळचा नवा कर्णधार म्हणून ग्यानेंद्र मल्लची ही पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका होती.
नेपाळने पहिल्या एकदिवसीय सामन्यात २ गडी राखून निसटता विजय मिळवला आणि मालिकेत १-० ने आघाडी घेतली. दुसऱ्या सामन्यात देखील १५१ धावांनी दणदणीत विजय मिळवत नेपाळने मालिका २-० ने जिंकली.
१ला सामना
संपादनवि
|
||
- नाणेफेक : पापुआ न्यू गिनी, फलंदाजी.
- नेपाळ आणि पापुआ न्यू गिनी मधील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना.
- नेपाळने ओमान मध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.
- नेपाळचा पापुआ न्यू गिनीवर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय विजय.
- कुशल भुर्टेल, आसिफ शेख आणि बिक्रम सोब (ने) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
संपादन