पथेर पांचाली

(पाथेर पांचाली, चित्रपट या पानावरून पुनर्निर्देशित)



पथेर पांचाली (बंगाली :পথের পাঁচালী, अर्थ:रस्त्याचे गाणे) हा एक प्रसिद्ध बंगाली भाषेतील भारतीय चित्रपट आहे. सत्यजित राय ह्यांनी निर्मिलेला व दिग्दर्शित केलेला हा पहिला चित्रपट आहे. हा चित्रपट इ.स. १९५५मध्ये पडद्यावर आला. हा चित्रपट ग्रामीण बंगालमधील एका गरीब कुटुंबात वाढलेल्या अपू नावाच्या तरुण मुलाची कथा सांगतो. हा चित्रपट ग्रामीण जीवनाचे वास्तव आणि साधेपणा दाखवतो. हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीचा एक उत्कृष्ट नमुना मानला जातो.

पथेर पांचाली
दिग्दर्शन सत्यजित रे
निर्मिती पश्चिम बंगाल राज्य सरकार
कथा सत्यजित रे
विभूतीभूषण बंडोपाध्याय
प्रमुख कलाकार कानू बॅनर्जी
करुणा बॅनर्जी
सुबीर बॅनर्जी
उमा दासगुप्‍ता
संकलन दुलाल दत्त
छाया सुब्रत मित्र
संगीत रवि शंकर
देश भारत
भाषा बंगाली
प्रदर्शित १९५५