पाणी व्यवस्थापन

(पाणी व्यस्थापन या पानावरून पुनर्निर्देशित)

आपल्या गावातील पाणी व्यवस्थापन सार्वजनिक पाण्याच्या स्रोतांचे समाजातील सर्व स्तरांना योग्य असे वितरण याला पाणी व्यवस्थापन असे म्हणतात. पाण्याचे प्रदुषण, स्रोतांचे आटणे, व जागतिक तापमान वाढ या कारणांमुळे हा प्रश्न स्थानिक ते जागतिक सर्व पातळ्यांवर उग्र स्वरूप धारण करतो आहे. पाण्याचे थेंबनी थेंबाचे नियोजन व व्यवस्थापन होण्यासाठी जलक्रांतीचे जनक सुधाकरराव नाईक यांनी जलसंधारण चळवळीसाठी पुढाकार घेऊन विविध अभिनव योजना राबविल्या.

वाढत्या किमती व स्थानिकांचे विस्थापन

पाणी व्यवस्थापनासाठी धरणे उभारणीला विरोध होतो आहे. मेधा पाटकर यांनी या संदर्भात जागृतीचे काम जगभरात केले आहे.

तसेच महाराष्ट्र राज्यात जलक्रांती घडवून आणणारे व जमिनीत पाणी मुरवणारे प्राचीन जोहड हा प्रकार पुरुज्जीवीत करणारेराजेंद्र सिंह उर्फ जोहड बाबा या सारखे लोक काही प्रमाणात या प्रश्नाला उत्तर शोधत आहेत.तसेच जलसंधारण ही सुद्धा आजची गरज आहे.

आपल्या गावातील पाणी व्यवस्थापन करावे असे आवाहन करावेमात आणि अधिकाधिक कृषी क्षेत्र नियोजनबद्ध सिंचनाखाली आणण्यासाठी क्रांतिकारी व दूरगामी स्वरूपाचे धोरणे माजी मुख्यमंत्री व प्रख्यात जलतज्ज्ञ सुधाकरराव नाईक यांनी आखले. आपले संपूर्ण आयुष्य जलसंधारणासाठी वेचणारे 'पाणीदार माणूस' म्हणून ही सुधाकरराव नाईक यांची ओळख आहे. त्यांनी 'पाणी अडवा पाणी जिरवा' हा मूलमंत्र दिला. पाण्याचे योग्य नियोजन व संवर्धन न झाल्यास महाराष्ट्राचे वाळवंट होईल. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन शास्त्रीय पद्धतीने पाण्याचे संवर्धन करण्यासाठी सुधाकरराव नाईक यांनी जलसंधारणाची चळवळ सुरू केली. सुधाकरराव नाईक यांच्या प्रेरणादायी कामगिरीच्या स्मरणार्थ तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी १० मे हा दिवस जलसंधारणाचे जनक सुधाकरराव नाईक यांचा स्मृतीदिवस 'जलसंधारण दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पासून सर्वत्र 'जलसंधारण दिन' म्हणून साजरा केला जातो.