पाकिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, १९९२-९३

पाकिस्तान क्रिकेट संघाने मार्च १९९३ दरम्यान एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला. हा पाकिस्तानने झिम्बाब्वेचा केलेला पहिला वहिला दौरा होता. फेब्रुवारी १९९३ मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेली वनडे तिरंगी मालिका खेळून झाल्यावर पाकिस्तानने झिम्बाब्वेचा दौरा केला. पाहुण्या पाकिस्तानचे नेतृत्व वसिम अक्रम याने केले.

पाकिस्तान क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, १९९२-९३
झिम्बाब्वे
पाकिस्तान
तारीख २ मार्च १९९३
संघनायक डेव्हिड हॉटन वसिम अक्रम
एकदिवसीय मालिका
निकाल पाकिस्तान संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली

हरारे स्पोर्ट्स क्लब येथे झालेला एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना पाकिस्तानने ७ गडी राखून जिंकला. जावेद मियांदाद याने केलेल्या नाबाद ८६ धावांच्या खेळीमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

संपादन

एकमेव एकदिवसीय सामना

संपादन
२ मार्च १९९३
धावफलक
झिम्बाब्वे  
१६४ (४९.१ षटके)
वि
  पाकिस्तान
१६५/३ (४७.२ षटके)
डेव्हिड हॉटन ५१ (७४)
मुश्ताक अहमद ३/२२ (१० षटके)
जावेद मियांदाद ८६* (१३२)
अली शाह १/२६ (१० षटके)
पाकिस्तान ७ गडी राखून विजयी.
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
सामनावीर: जावेद मियांदाद (पाकिस्तान)
  • नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
  • झिम्बाब्वेत पाकिस्तानने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळला.