पहिला राजेंद्र चोळ हा चोळ साम्राज्याचा महान राज्यकर्ता पहिला राजराज चोळ याचा पुत्र होता. आपल्या वडिलांसारखेच साम्राज्यवादी धोरण स्वीकारून त्याने चोळ साम्राज्याच्या सीमा आग्नेय आशियापर्यंत वाढवल्या. पहिला राजेंद्र चोळ हा भारतीय इतिहासातील एकमेव सेनानी आहे, ज्याने भारताबाहेरील देश जिंकण्यास नौदलाचा प्रभावी वापर केला.