पल्लवी सुभाष

चित्रपट अभिनेत्री

पल्लवी सुभाष या चित्रपट, जाहिरात, मालिका आणि नाटक या माध्यमात काम करणाऱ्या अभिनेत्री आहेत. त्यांनी आजवर मराठी, हिंदी, तमिळ तेलुगू, कन्नड, श्रीलंकन अश्या अनेक भाषांमद्धे काम केले आहे.

पल्लवी सुभाष
पल्लवी सुभाष
जन्म

पल्लवी सुभाष शिर्के
९ जून, १९८३ (1983-06-09) (वय: ३९)

[१]
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी

कारकीर्दसंपादन करा

मालिकासंपादन करा

बी कॉमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पल्लवी सुभाष यांना नाटकाची विचारणा झाली आणि त्यानंतर त्यांचा कला क्षेत्रात प्रवास सुरू झाला, तुम्हारी दिशा या मालिकेमार्फत त्यांनी पदार्पण केले, यानंतर एकता कपूर यांनी त्यांना करम अपना अपना या मालिकेत गौरी या पत्रासाठी निवडले, त्यानंतर त्यांनी अनेक मालिकांमधून काम केले.

चित्रपटसंपादन करा

कुंकु झाले वैरी या २००५ मद्धे प्रदर्शित झालेल्या चित्रपटामार्फत त्यांनी चित्रपटात पदार्पण केले, या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना झी गौरव सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री साठी नामांकन मिळाले. त्यानंतर त्यांनी आयला रे, अशी मी अशी ती, प्रेमसूत्र, धावा धावा खून खून या मराठी भाषेतील चित्रपटासोबत इतर भाषेतील चित्रपटात देखील काम केले.

मालिकासंपादन करा

वर्ष मालिका भूमिका
२००४-२००६ तुम्हारी दिशा प्रीता
२००६-२००९ करम अपना अपना गौरी शिव कपूर / मीरा
२००७-२००९ कसम से मीरा
२००८-२००९ आठवा वचन स्नेहा अहुजा
२००९ बसेरा केतकी संघवी
२०१० गोद भराई अस्था
२०१२ कॉमेडी एक्स्प्रेस निवेदिका
२०१३-२०१४ महाभारत रुक्मिणी
२०१५-२०१६ चक्रवर्ती अशोक सम्राट धर्मा / शुभाद्रंगी
२०१२ श्रीयुत गंगाधर टिपरे[२]
२००५ अधुरी एक कहाणी
२०१४ कॉमेडीची बुलेट ट्रेन निवेदिका
२०११ गुंतता हृदय हे [३] अनन्या

चित्रपटसंपादन करा

वर्ष चित्रपट भूमिका भाषा
२००५ कुंकु झालं वैरी कमल मराठी
२००६ आयला रे !! निशा
२००६ तुझं माझं जमेना
पोलिसाची बायको
सगे सोयरे
नो प्रॉब्लेम
चाक्रविव्ह
२०१३ प्रेमसूत्र सानिया
असा मी अशी ती
धावा धावा खून खून
ओम
२०१४ हॅप्पी जर्नी अलीस मराठी
२०१६ नारुदा डोनोरुदा अशिमा रॉय तेलुगू
२०१७ यशोधरा श्रीलंकन
२०१८ रास्कल कन्नड

[४]

संदर्भसंपादन करा