परमनंट अकाउंट नंबर
परमनंट अकाउंट नंबर (पॅन)(इं. लघुरुप:PAN) हा आयकर भरणाऱ्या भारतीय नागरिकासाठी अत्यावश्यक असलेला एक ओळख संकेतांक आहे, भारतीय आयकर अधिनियम, १९६१ अंतर्गत देण्यात येणारा हा परमनंट अकाउंट नंबर, अंक व इंग्रजी मुळाक्षरांची सरमिसळ असलेला १०-अंकी संकेतांक असतो. हा नंबर भारताच्या आयकर विभागातर्फे दिलेल्या एका कार्डावर असतो. कार्डावर नागरिकाचे छायाचित्रही असते. हे कार्ड ओळखीचा एक महत्त्वाचा पुरावा म्हणूनदेखील मान्य केला जातो.[१][१]
पॅन कार्ड | |
---|---|
परमनंट अकाउंट नंबर कार्डचा एक नमुना | |
प्रथम जारी करण्याचा दिनांक | १९७२ |
तर्फे वितरीत | भारत |
उद्देश | ओळखण व आयकर |
यावरील संकेतांक कसा ठरविल्या जातो
संपादनपॅनचे उदाहरण:ARLPA0061H. यात सुरुवातीला AAA पासून ZZZ पर्यंतची कोणतीही तीन मुळाक्षरे असतात. चौथे मुळाक्षर कार्डधारकाची जातवारी सांगते. ती अशी :
- कार्डधारक ही एक संघटना असेल तर चौथे मुळाक्षर A असते.
- कार्डधारक जर लोकांचा गट असेल तर चौथे मुळाक्षर B असते.
- कार्डधारक जर कंपनी असेल तर चौथे मुळाक्षर C असते.
- कार्डधारक जर फर्म असेल तर चौथे मुळाक्षर F असते.
- कार्डधारक जर सरकारी कार्यालय असेल तर चौथे मुळाक्षर G असते.
- कार्डधारक जर सरकारी हिंदू एकत्र (अविभक्त) कुटुंब असेल तर चौथे मुळाक्षर H असते.
- कार्डधारक जर स्थानिक स्वराज्य संस्था तर चौथे मुळाक्षर L असते.
- कार्डधारक जर न्यायसंस्थेचा सभासद नसून न्यायसंस्थेसंबंधी काम करत असेल तर चौथे मुळाक्षर P असते.
- कार्डधारक जर आयकर भरणारी किंवा न भरणारी सर्वसाधारण व्यक्ती असेल तर चौथे मुळाक्षर J असते.
- कार्डधारक जर एखादा न्यास असेल तर चौथे मुळाक्षर T असते.
परमनंट अकाउंट नंबरचे पाचवे मुळाक्षर व्यक्तीच्या किंवा संस्थेच्या नावाशी संबंधित असते.
पॅनची शेवटची मुळाक्षरे किंवा आकडे हा अंकीय ताळा असतो.
सध्या भारतात पॅनचा उल्लेख कोणत्या व्यवहारात अनिवार्य आहे
संपादन- कोणत्याही बँकिंग कंपनी किंवा सहकारी बँकेत एकाच दिवशी ५०,००० इतकी किंवा त्याअधिक रक्कम जमा करतांना.
- कोणत्याही बँकिंग कंपनी किंवा सहकारी बँकेत एकाच दिवशी ५०,००० पेक्षा रोख रकमेचा बेंक ड्राफ्ट/ पे ऑर्डर किंवा बँकर्स चेक बनवितांना.
- कोणत्याही बँकिंग कंपनी किंवा सहकारी बँकेत अथा टपाल कार्यालयात सावधी ठेवेत(टाइम डिपॉझिट) रक्कम जमा केल्यास.
- कोणत्याही बँकिंग कंपनी किंवा सहकारी बँकेत (वर नमूद केलेल्या सावधी ठेव/जनधन/मूळ बँक खात्याच्या ठेवीव्यतिरिक्त) नवीन खाते उघडल्यास.
- सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेसच्या अधिनियमानुसार दि. ०९.११.२०१६ ते ३०.१२.२०१६ या अवधीत एकूण रु.२,५०,००० किंवा त्या अधिक रोख रक्कम जमा केल्यास.
पॅन कसे प्राप्त करावे
संपादन- आयकर कार्यालयात साध्या कागदावर अर्ज देउन.
- १. या संकेतस्थळामार्फत ऑनलाइन पद्धतीने
- २. या संकेतस्थळामार्फत ऑनलाइन पद्धतीने[permanent dead link]
हरवलेले पॅन कार्ड नवीन कसे काढावे ?
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
संपादन- ^ a b "टिन (इंग्रजी मजकूर)". 2017-03-25 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2016-11-17 रोजी पाहिले.
बाह्य दुवे
संपादन- भारत सरकारच्या आयकर विभागाचे अधिकृत संकेतस्थळ व संबंधित दुवे Archived 2016-01-26 at the Wayback Machine. (इंग्रजी मजकूर)