पृथ्वीवर उगम न झालेल्या जीवांना परग्रहावरील जीव असे म्हणतात. यांत विषाणू, जीवाणू सदृश जीवांपासून ते मानवासारख्या गुंतागुंतीच्या जीवांचा समावेश होतो. बाह्यजीवशास्त्र या विज्ञान शाखेत याचा अभ्यास केला जातो.

परग्रहावरील जीवनाचा शोध

सेटी ही संस्था परग्रहावरील जीवनाचा शोध घेणारी संस्था आहे.

परग्रहावरील जीवनाबाबत ठोस पुरावा नसला तरी खालील गोष्टींमुळे त्याच्या अस्तित्वाची खूप मोठी शक्यता आहे.

आपल्या आकाशगंगेत अब्जावधी ग्रह आहेत.

आपल्या सूर्यमालेतील अनेक ग्रहांवर आणि उपग्रहांवर द्रवरूप पाणी आहे.

पृथ्वीच्या जन्मानंतर काही काळातच येथे जीवाणू निर्माण झाले.

पृथ्वीवर अत्यंत विषम परिस्थितीत सुद्धा जीवसृष्टी आढळते.

परग्रहावरील जीवसृष्टी असली तरीही त्यांच्या व आपल्यामध्ये अनेक प्रकाशवर्षांचे अंतर आहे. त्यामुळे संदेशवहनाला खूप वेळ लागतो.