पद्मा गोळे

मराठी कवयित्री, लेखिका व नाटककार

पद्मा गोळे (जुलै १०, इ.स. १९१३; तासगाव - फेब्रुवारी १२, इ.स. १९९८) या मराठी कवयित्री, लेखिका, नाटककार होत्या.

पद्मा गोळे
जन्म नाव पद्मावती विष्णू गोळे
टोपणनाव पद्मा
जन्म जुलै १०, इ.स. १९१३
तासगाव, जि.सांगली महाराष्ट्र
मृत्यू फेब्रुवारी १२, इ.स. १९९८
पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र साहित्य
भाषा मराठी
साहित्य प्रकार कविता, नाटक
पती विष्णू गोळे

पद्मा गोळ्यांचा जन्म १० जुलै, इ.स. १९१३ रोजी तासगाव येथील पटवर्धन राजघराण्यात [] जन्म झाला. पुण्याच्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालयातून[] एम.ए. पदव्युत्तर अभ्यासक्रमापर्यंत त्यांचे शिक्षण झाले [].

त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रीतिपथावर हा इ.स. १९४७ साली प्रकाशित झाला[]. कवितासंग्रहांशिवाय त्यांनी रायगडावरील एक रात्र, स्वप्न (इ.स. १९५५), नवी जाणीव या नाटिकाही लिहिल्या. त्यांनी लिहिलेली वाळवंटातील वाट नावाची कादंबरीही प्रकाशित झाली.

प्रकाशित साहित्य

संपादन
शीर्षक साहित्यप्रकार प्रकाशक प्रकाशनवर्ष (इ.स.) भाषा
आकाशवेडी कवितासंग्रह इ.स. १९६८ मराठी
श्रावणमेघ कवितासंग्रह मराठी
प्रीतिपथावर कवितासंग्रह इ.स. १९४७ मराठी
निहार कवितासंग्रह इ.स. १९५४ मराठी
स्वप्नजा कवितासंग्रह इ.स. १९६२ मराठी
स्वप्न नाटक इ.स. १९५५ मराठी
रायगडावरील एक रात्र नाटक मराठी

संदर्भ

संपादन
  1. ^ a b गोखले, विमल. "गोळे,पद्मा" : मराठी विश्वकोश, खंड ५. १० जुलै, इ.स. २०१२ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ a b "पद्मा गोळे". 2011-11-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ११ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)

बाह्य दुवे

संपादन