पद्माक्षी रेणुका
पद्माक्षी रेणुका | ||
![]() | ||
नाव: | श्री पद्माक्षी रेणुका | |
---|---|---|
देवता: | पद्माक्षी रेणुका | |
वास्तुकला: | कौलारू | |
स्थान: | कावाडे, अलिबाग, महाराष्ट्र | |
तळटिपा: | तलावावर वसलेलं कौलारू मंदिर आहे |
पद्माक्षी रेणुका देवीला नारायणी,शताक्षी, किंवा पद्मांबिका असे तिचे काही मूळ नावं .देवीची नाव जरी वेगळी असली तरी ही देवी एक त्रिपुरसुंदरी देवीचे स्वरूप असून ती १०८ आणि भारतातील ५२ शक्तीपीठांपैकी एक नारायणी शक्तीपीठ आहे काही लोक या स्थानाला आद्यापिठ असे ही म्हणतात. परंतु महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठात याचा समावेश होत नाही.[१] ही वामशत्की(सिंह) या प्राण्यावर आरूढ झालेली आहे. शिवाय, तिला जोगेश्वरी नावाची एक बहीण देखील आहे. देवी पद्माक्षी भगवतीला शताक्षी, पद्माकोषा ,माऊली, काली, भैरवी, वज्रेश्वरी, अंबा आणि एकवीरा म्हणूनही ओळखली जाते.
पौराणिक कथा संपादन
पद्माक्षी रेणुका किंवा पद्मांबिका देवी या स्वतः मुलामहामाया आहेत, ती त्रिदेवांची उत्पत्ती आणि या विश्वाची आहे. तिच्या हिरण्य गर्भातून संपूर्ण विश्वाचा जन्म झाला अशी देखील मान्यता आहे. तिला दुर्गांबिका असेही म्हणतात.
एकदा प्रजापती दक्षाने एक यज्ञ केला. यज्ञासाठी दक्षाने शिव आणि सती वगळता सर्व देवतांना आमंत्रित केले. माहेरी जायला निमंत्रणाची गरज नसते असे सतीने मानून तिने शिवाकडे यज्ञात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. शिवाने तिला रोखण्याचा प्रयत्न केला परंतु ती शिवाला न जुमानता एकटी माहेरी गेली. तथापि, तिथे दक्षाने तिचा आणि शिवाचा अपमान केला. संतापून, सतीने तिच्या वडिलांना श्राप दिला आणि स्वतःला आत्मदहन केले. संतप्त झालेल्या शिवाने आपल्या वीरभद्र अवतारात दक्षाचा यज्ञ नष्ट केला आणि त्याचा शिरच्छेद केला. क्रोध आणि शोकग्रस्त, शिवाने सतीच्या शरीराचे अवशेष उचलले आणि संपूर्ण सृष्टीमध्ये तांडव केले. घाबरून इतर देवतांनी विष्णूला हा विनाश थांबवण्याची विनंती केली. यावर उपाय म्हणून विष्णूने सतीच्या प्रेतावर सुदर्शन चक्र वापरले. यामुळे सतीच्या शरीराचे विविध भाग पृथ्वीवर पडून शक्तीपीठ तयार झाले, तिच्या शरीराचा वरचे दात वेरुमाला किंवा आनला (आजचे कवडे) श्रीबाग (अलिबाग) किंवा (कुलाबा) येथे पडले. त्या भागातून एक देवी प्रकट झाली आणि तिचे नाव नारायणी(नंतर तिला शांभवी अशी ओळख भेटली) होते म्हणुन ते नारायणी शक्तीपीठ असे नाव पडले.जिथे कुठे सती देवीचे अवशेष पडून स्थान निर्माण झाले तिथे भगवान शंकराने आपला अंश रुपी भैरव वेगवेगळ्या ठिकाणी त्या शक्तीपीठा सोबत वेगवेगळ्या नावनं प्रकट झाला .याच कारणामुळे इथे सुधा भैरव या स्थानी सम्हारा अश्या नावने या नारायणी शक्तीपिठाची रक्षण करत आहे.
शक्तीपीठ स्तोत्र:
सहाराख्य उर्धदन्तो देवीनाले नारायणी श्रुचौ।
काही काळानंतर देवी सतीने देवी पार्वती म्हणून पुनर्जन्म घेऊन या जगात अवतार घेतला आणि कठोर तपश्चर्या केल्यानंतर तिने भगवान शंकराशी विवाह केला. देवी पार्वतीची जोगेश्वरी नावाची एक सखी होती जी राजा तक्षक (सापांचा राजा) ची कन्या होती जी एक सर्प कन्या होती. देवी पार्वती भगवान शंकराबदल सर्व गोष्टी सांगायची, याचा जोगेश्वरीला खूप हेवा वाटला, तिचा ही तसाच पती असावा असे तिला वाटू लागले. त्यामुळे जोगेश्वरीने पण भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केली आणि त्यांना प्रसन्न केले आणि वरदान म्हणून जोगेश्वरीने तिच्याशी लग्न करण्याचे वर मागितले, ही कल्पना देवी पार्वतीला तिच्या देवी शक्तीने लगेच लक्षात आली. देवी क्रोधित होऊन त्याच क्षणी जोगेश्वरीसमोर प्रकट झाली आणि तिला भुलोकामध्ये मोठ्या कष्टाने आणि पिडादयी जीवन जगण्याचा श्राप दिला आणि तिला आपली इच्छा मागे घेण्यास सांगितले.जोगेश्वरीने देवी पार्वतीच्या श्रापा आणि रागामुळे भगवान शंकराला तिची इच्छा मागे घेण्याची आणि त्याबदल्यात महादेवनासारखा दिसणारा आणि शिवभक्त असलेला पती मिळवण्याची विनंती केली. तर देवी पार्वतीने या वर काळभैरव यांचं नाव सुचवले जो भगवान शंकरांचा प्रतिरूप होते आणि काशीचा कोतवाल होता.भगवान शंकरांनी आणि देवी पार्वती जोगेश्वरीचा विवाह कालभैरव यांच्याशी लाऊन दिले. पण लग्नानंतर लगेचच त्यांना वियोग सहन करावा लागला कारण देवी पार्वतीने दिलेल्या श्रापामुळे जोगेश्वरीला भुलोकात उतरण्याची वेळ आली.
थोड्याच काळात देवी पार्वतीने आपले नवीन अवतार घेऊन भुलोकी जन्म घेतला जिचे नाव होते रेणुका जी परशुराम अर्थात श्री विष्णूचे ६ वे अवतार यांची माता आणि आदिशक्तीचा एक रूप होती.अशी आख्यायिका आहे की रेणुका ही जमदग्नी ऋषींची पत्नी होती आणि त्यांनी तिच्यावर विश्वासघात केल्याचा संशय घेऊन आपला पुत्र परशुरामाला आपल्या आईचा शिरच्छेद करण्याचा आदेश दिला. भगवान परशुरामाने आपल्या वडिलांची आज्ञा पाळली आणि तिचे शिर धडा वेगळे केलं ने नेंमक त्याच जागी अधलाळ जिथे नारायणी देवी अर्थात देवी सतीचे अंश पडले होते ते ठिकाण म्हणजे कावाडेपुरि(आधीचे अनळा/विरुमळा) श्रीबाग (आताचे अलिबाग).
दोन्ही देवी तिथे दीर्घ काळ एकत्र एका खडकावर निवास करू लागल्या.बरेचं वर्षाने श्री महागणपती अर्थात स्वतः श्री ओंकार यांनी त्या दोन्ही देवींचे फुडचे अवतार कार्य संगण्याकरिता त्या दोन्ही आदीशक्तींना दर्शन दिले आणि त्या जागी श्री यंत्राची "स्थपना" केली .आदिशक्ती रेणुका देवी आणि नारायणी देवी या दोन्ही आदिशतींना श्री महागणपतीने एकरूप करून एक ऊर्जा रूपात प्रकट केले.या ऊर्जा रुपी आदिशक्तीला सांगितले की तू या श्रीयंत्राची तपश्चर्या कर कारण तो यंत्र देवी त्रिपुरसुंदरी समर्पित आहे . आणि देवी भगवती कडून इथे या ऊर्जेत व या स्थानी देवकल्यान व लोकहितासाठी एक नव्या रूपात प्रकट हो. आज्ञच पालन करून ती ऊर्जा रुपी आदिशक्ती त्या श्री यंत्राची कठोर तपस्या केली.
(त्रिपुरसुंदरी:- त्रिपुरा सुंदरी ही दस महाविद्यांमधली अग्रगण्य, हिंदू धर्माची सर्वोच्च देवता आणि श्री विद्याची प्राथमिक देवी आहे. त्रिपुरा उपनिषद तिला विश्वाची अंतिम शक्ती (ऊर्जा, शक्ती) म्हणून ओळखली जाते. ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तिन्ही लोकांची स्वामींनी व राज्य करणारी, सर्वोच्च चेतना म्हणून तिचे वर्णन केले जाते.ती या सृष्टीची व देवी देवतांची उत्पती आहे.ती या त्रिदेविंची अर्थात त्रीआदीशक्तींची उत्पती आहे.)
देवी भगवती त्रिपुरा सुंदरी देवी त्या ऊर्जारुपी आदिशक्तीची भक्ती पाहून प्रसन्न झाली आणि त्या ऊर्जेसमोर प्रकट होऊन वरदान किंवा इच्छा विचारली. तेव्हा ती उर्जा म्हणाली -यापूर्वी मी इथे दोन रूपात राहत होते रेणुका आणि नारायणी देवी अश्या रूपात पण श्री ओंकाराने आम्हा दोघांना एकत्र केले आणि मला तुझी पूजा करण्यास सांगितले आणि तुला माझ्या या उर्जेत आणि जागेत प्रकट होण्यास सांगितले"; म्हणून देवी तू वरदानाच्या रूपात ओंकाराची इच्छा पूर्ण कर. देवी त्रिपुरा सुंदरी मूळ भगवती त्याची व महागणपीची ईच्छा वरदान स्वरूपात पूर्ण केली. आणि या उर्जरुपी आदीशक्तीने सांगितल्याप्रमाणे, त्या शक्तीच्या रूपात देवी आदि पराशक्ती भगवती त्रिपुरसुंदरी त्या ऊर्जेत व त्या स्थानी प्रकट झाली.पण देवी भगवतीचे तेज व ऊर्जा इतकी होती की हे स्थान व या धरतीला ते धारण अवघड जाऊ लागली कारण ही माता भगवती ही निर्गुण अनादी स्वरूपात या सृष्टीत वास करत होती पण ती या ठिकाणी एक साकार रूपात व सृष्टीची सर्व ऊर्जा एका ठिकाणी जमा झाल्यामुळे ती असंतुलित झाली. याच मुळे देवी भगवती त्रिपुरसुंदरीने आपली सर्व शक्ती थोड्या काळासाठी त्रिदेविंकडे विभाजित केल्या व देवी भगवतीने कठोर तप करून त्या पुन्हा एकदा त्या आपल्या साकार नव्या स्वरूपात संतुलीत करू शकेल. याच साठी देवीने आपला तप भंग होऊ नये म्हणून आपल्या त्रिशक्ती(सरस्वती,लक्ष्मी व काली) आपल्यातन प्रकट करून आपल्या भवती एक कवच तयार करण्यास सांगितलं जो कोणीही देवीला पाहू व भेदू शकणार नाही. फक्त देवीची प्रिय भक्त जयाद्री हा कवच भेदून आता येऊ शकते इतर कोणीही नाही .
जयाद्री ही स्वतः एक शक्तीचे रूप होते म्हणजेच ती जोगेश्वरीच जी देवी पार्वतीची सखी होती जिला देवी पार्वती मातेच्या श्रापामुळे भुलोकत अवतरीत वाहव लगल. जिने रेणुका अवतार तिचे कार्य संपल्या नंतर ती पुन्हा देवी पार्वती कडे क्षमा याचना करण्यासाठी कैलास गडवर निघाली होती पण तिला एके रात्री देवी पार्वतीने स्वतः स्वप्नात दर्शन देऊन तिला रेणुका देवींचे जिथे क्षिर पडले, तिथे जाऊन तू दर्शन घे तर तुला तुझ्याच काही गोष्टींचा उलगडा होईल असा सांगितले .या मुळे देवी सर्व रेणुका देवीच्या स्थानी दर्शन घेतले व शेवटी ती अनळा/वीरुमाला अर्थात कावाडेपुरात येऊन पोहचली.त्या वेळी देवी रेणुका आणि देवी नारायणी त्या ठिकाणी एक ऊर्जे रूपात श्री यंत्राची तपस्या करण्यात लिंन होते त्या मुळे तिथे असणाऱ्या देवी सपत्मत्रिकेनी देवी जोगेश्वरीला उर्जरूपी देवी रेणुका आणि नारायणीचे दर्शन घेण्यापासून अडवले.याच कारणामुळे जोगेश्वरी तिचं शेवटचं दर्शन नाही घेऊ शकली म्हणून या दोन्ही देवीच तपस्या पूर्ण होई पर्यंत ती जवळच असणाऱ्या ऋषी वरुचिक मुनीच आश्रम होते तिथे जोगेश्वरी थोडा काळ वास्तव्य केलं.
पण जोगेश्वरी तिथे इतकी रमली की ऋषी वरुचीक मुनीची पत्नी वाद्री हिने जोगेश्वरीला त्यांची मुलगी स्वरूपात राहण्याची इच्छा जोगेश्वरी समोर मांडली.कारण वरूचील मुनी ची पत्नी वाद्री हिला मुल नसल्या मुळे तिने पुत्रप्राप्तीसाठी तपस्या केली जी एका गंधर्वांनी नकळत पणे तिथून जात त्याच्या धक्का त्या तपस्या करत आलेल्या वाड्री लागतो जेणे करून तिचा तप भंग होतो .त्या बदल्यात रागाच्याभरात ऋषी पत्नी वाद्रि त्याव गांधर्वाला एक विचित्र प्राणी बाण्याचा श्राप देते व त्या प्राण्याच्या योनीत जाण्या आधी तू एक राक्षस रूपात जन्म घेशील.हेच जोगेश्वरीने पाहून तिने वड्रिची ती इच्छा पूर्ण केली व आपला भूतकाळ विसरून भूलोकात ऋषी वरूचीक आणि त्यांची पत्नी वद्रि यांची मुलगी जयाद्री अश्या नावने राहू लागली.देवी जोगेश्वरी देवी त्रिपुरसुंदरी देवीच अत्यंत श्रद्धा आणि भक्तीने सेवा करत असत.
त्याच दरम्यान दैत्यालोकी शुक्ला नावाच्या स्त्रीच्या गर्भातून ब्रहमदेवाच्या वरदान मुळे एका विकृत दैत्यांचा जन्म झाला. कुंभसुर हा एक वेगळच दैत्य होता जो नाही असुर , राक्षस , पिशाच्च कुळातील होता. त्याला भगवान शंकरन कडून अमरतवचे वरदान होते. त्याला वैशाख शुद्ध पौर्णिेला त्या एक स्त्रीचं मारू शकते जी दोन भिन्न शक्ती पासून शक्तीशाली स्त्री उत्पन्न झाली असेल.पण ती दुर्गेपेक्षा ही शक्तिशाली आणि कुमारी स्वरूपात असावी.जिला सर्व त्रिदेव आणि त्रिदेवी नमन करतात वर स्वरूपात दिला.कुंभासूराला वाटले की अशी शक्ती या जगत असूच शकत नाही जिला त्रिदेव आणि त्रिदेवि जिच्या समोर नतमस्तक होत असतील .
त्याला त्रिलोक्यवर आणि या सृष्टी वर राज्य करायचे होते.त्या मुळे तुला या सृष्टीत हा हा कार माचला .सर्व देव भयभीत झाले व भगवान शांकरा कडे धाव घेतली.पण काही उपाय नव्हते सापडत कारण त्याला कोणी देव नहीं मारू शकत असे वरदान होते.
देवी त्रिपुरसुंदरी ज्या निवासस्थानी असणाऱ्या प्रदेशातून जेव्हा कुंभासुर् जात होता तेव्हा त्यांनी ज्याद्रिला पहिला व तिच्यावर मोहित झला व तिला जबरदस्तीने पळून नेण्यासाठी तिच्यासमोर आला. जयाद्रीचा हात ज्या क्षणी कुंभसूराने पकडला तेव्हा जयाद्री ला वाटले आपण अपवित्र झालो व स्वतःला तिने स्वयं ऊर्जेच्या शक्तीने भास्मिभुत केले.ही गोष्ट देवी त्रिपुरसुंदरी आपल्या अंतज्ञानाने कळली व देवीचा कोप झाला व आपल्या भक्त जोगेश्वरी चा आपमान झाल्यामुळे देवी कवच भेदून बाहेर आली.देवी बाहेर येताच कूंभासुराला देवीच सौंदर्य फार आवडले व तिला त्याच्याशी विवाह करण्या सांगितले.देवीला राग अनावर झाला व देवीने युद्ध करण्यास सांगितले.त्यावर कुंभासुराने देवी भगवतीला अट घातली की हे तो युद्ध जिंकला तर देवीला त्याच्या सोबत त्याच्या प्रदेशात जावा लागेल.देवी ने युद्धास मंजुरी दिली व तो तिथून निघून गेला . देवीला आपल्या भक्त जोगेश्वरीची राख पाहून देवी भाऊक झाली व अचानक देवीच्या डोळ्यातलं एक ठेम त्या राखेत पडल तिथून एक देवी विकसित झाली ती म्हणजे देवी जोगेश्वरी. आणि याच नवीन रूपामुळे देवी जोगेश्वरी श्रापमुक्त सुधा झाली.
देवी कुंभासुराशी युद्धासाठी सज्ज झाली तिने सप्तमातृका, महाविद्या, त्रिदेवी, नवदुर्गा आणि दुर्गा या शक्ती एकत्र करून पुन्हा एकदा तिच्यात सर्व शक्ती जागृत केली. परब्रह्म (ओम) च्या आशीर्वादाने तिने ललितांबिका नावाची पराशक्ती अवतार देवी महामाया धारण केली जी स्वतः श्री चक्रापासून उत्क्रांत झाली, परंतु हा अवतार अतिशय आक्रमक, अक्राळ आणि उग्र होता. तिला नंतर पद्मांबिका भैरवी म्हणून ओळखले जाऊ लागले. युद्ध कार्तिक पौर्णिमेला सुरू झाले.या युद्धात देवी ला सर्व देवी देवतांनी साथ दिली. या युद्धात सर्व देव,त्रिदेव आणि त्रिदेविंने भगवतीची साथ दिली .याच काळात त्रिदेवी जी देवी पद्मांबिका देवीनं मिळून कुंभासुराच्या चार मानस पुत्रांचा वध केला. विटुंग नावाच्या पहिल्या पुत्राचा महाकालीने तलवारीने वध केला, दुसरा मुलगा हिरादूरचा महालक्ष्मीने सुदर्शन चक्राने वध केला. मलिंगाचा तिसरा मुलगा महासरस्वतीने तिच्या कुऱ्हाडीने मारला आणि शेवटचा चौथा वजरासुर नावाचा पुत्र जो की मागील जन्मात तो तोच गंधर्व होता ज्याला वरूचिक पत्नी वद्रीचा श्राप मिळाला होता.जो कुंभासुरासारखा शक्तिशाली होता म्हणून देवी पद्मांबिका भैरवीने त्याला मारण्यासाठी तिच्या त्रिशूळाने त्याचे डोके कापले. तेव्हा वज्रासुराच्या शरीरातून एक विचित्र प्राणी (सिंह) विकृती प्रकट झाली. जे पद्मांबिका देवीने त्याचं भूतकाळ समजून त्याला आपले वाहन केले.त्यांचे नाव विमश्टकी ठेवले.
देवीने विमश्टकीवर आरुढ होऊन त्रिदेवानी निर्माण केलेले चिंतामणि खड्ग हाती घेऊन कुंभासुरसमोर उभी राहिली.देवी ने त्या कुंभासुरला अखिर ची चैतवणी दिली आणि शरण यायला सांगितलं पण त्यानी काही मातेच एकला नहीं.आणि त्याने युद्ध देवी सोबत वेगळे वेगळे शद्यंत्रा रचून युद्ध करू लागला शेवटी देवी खूप क्रोधित झाली आणि आपला अतिशय प्रचंड विराट रूप धारण केलं ज्यला देव ही आपल्या डोळ्यान मऊ शकत नव्हते इतका तेज आणि ज्वाळा त्या स्वरूपातन बाहेर निघत होते. स्वतःह श्री ओंकार(महागणपती) आणि त्रिदेव तिचे रूप पाहून थक झाले . देवीचे हे रूप पाहून सर्व देव घाबरले पण धन्य सुधा झाले .
(देवीचे महामायेचे स्वरूप - सहस्र हात, सहस्त्र शिर, निळ लाल पांढरा असे वर्ण, लांब केश जटा, मळवट आगदी सूर्यासारखे, डोक्यावर चंद्र, लाल गोलाकार डोळे,शरीरातून अग्नी बाहेर पडत, नाना आयुधे व आलंकार.)
देवीचे हे रूप पाहून कुंभसूर घाबरून अवघ्या स्सृष्टीत पळू लागला.अखिरच्या क्षणी देवीने त्यचे मुंड पकडुन विमश्टकरुड होऊन त्याचे शिर आपल्या चिंतामणी खडगणा ने धडा वेगळे केले.पण देवीचा राग थांबेना देवी उग्र तांडव करून लागली व तिचे प्रचंड स्वरूप खूप वेगाने सृष्टी विनाशा कडे वळू लागली .तितक्यात श्री महागणेशाच्या (ओंकार)म्हण्यानुसर त्रिदेवानी बालक रूप घेऊन तिच्या समोर प्रकट झाले व रडू लागले.माता आपल्या बालकांना रडताना पाहून शांत होऊन त्यांना दूध पाजुन शांत केले.देवीच्या प्रचंड तेज आणि अग्नी मुळे देवीच्या शरीरावर घाव झाले होते तर सर्व देवांनी ते घाव कडुनिंब आणि हळदीचा उपयोग करून कमी केले ज्या कारणा मुळे देवी पद्मांबिका रेणुकेला या दोन्ही गोष्टी प्रिय आहेत
आज ही देवी पद्मांबिकेलाच कलियुगात पद्माक्षी रेणुका किंवा पद्माक्षी भैरवी या नावाने ओळखली जाते आणि तिने कुंभासुराचा वध केल्यामुळे तिला कुंभसुरभैंकरी असेही म्हणतात. तिने वज्रासुराचा वध केल्यामुळे गणेशाने तिला वज्रेश्वरी हे नाव दिले.
नंतर देवी पद्माक्षी भैरवीचा मुकुंदभैरवाशी विवाह झाला जो आदि महादेव अवतार होता ज्याला सदाशिव (परब्रह्मस्वरूप किंवा परब्रह्म ओंकारद्वारे त्रिदेव संयोजन) म्हणून ओळखले जाते. हे "पद्माक्षी मुकुंदेश्वर" लग्न म्हणून ओळखले जात होते कारण हे संपूर्ण विश्वातील सर्वात सुंदर विवाह होते. विवाहणांतर पद्माक्षी आणि मुकुंदभैरव एकटे रमले असताना देवी जोगेश्वरी त्यांच्या नकळतपणे त्यांचे सुंदर क्षण पाहत होती.अचानक देवी पद्माक्षीने पाहिले की जोगेश्वरी त्यांना एका झाडाच्या मागे लपून पाहत आहे आणि देवी पद्माक्षी रागावली आणि तिने जोगेश्वरीला शाप दिला की ती इथेच जमिनीत दडून जाईल. त्याच ठिकाणी. गैरसमज झाला. देवीने रागाच्या भरात मुकुंदभैरवानाला विरुमाला (कवडेपुरी) सोडण्यास सांगितले. देवीची आज्ञा समजून ते कनकपुरी (आताचे मांपगाव) इथे गेले. अल्पावधीतच देवीचा राग शांत झाला आणि देवी पद्माक्षीने जोगेश्वरीला आपल्या शापातून मुक्त केले, पण देवी जोगेश्वरीनेही तिच्या वागणुकीची क्षमा मागितली आणि प्रायश्चित्त म्हणून जोगेश्वरीने या सृष्टीच्या शेवटपर्यंत पद्माक्षी देवीची सेवा करण्याचे शपत घेतली. जोगेश्वरीने तिची जागा पद्माक्षी देवीच्या शेजारी घेतली.
त्यानंतर देवी पद्माक्षी कनकपुरीला गेली आणि त्यांनी भगवान मुकुदभैरवांना क्षमा मागितली आणि विरुमले (कवडे) येथे परत येण्याची इच्छा व्यक्त केली परंतु मुकुंदभैरवाने येण्यास नकार दिला कारण मुकुंदभैरव तेथे एका भक्ताला भेटले ज्याने येथून कोठेही न जाण्याची इच्छा व्यक्त केली. ते येथे राहू लागले आणि आज हे ठिकाण कनकेश्वर म्हणून ओळखले जाते. तरीही, भगवान मुकुंदभैरव आपली पत्नी पद्माक्षीला भेटण्यासाठी दरवर्षी नागाच्या रूपात कवडेपूरला येतात.
नाम कथा संपादन
भगवान परशुराम जेव्हा आपल्यात भूमीत अर्थात परशुरामाची भूमी कोकणात आपल्या आईच्या घटने नंतर परत आला तेव्हा त्या ठाऊक नव्हते की आपल्या आईच शिर याच कोकणात पडले. जेव्हा तो देवी रेणुकेच्या विरुमला(आताचे कवाडे)निवस्थातून जात असताना देवी रेनुकने आपल्या मुलाला हाक मारली पण त्याने तिचा आवाज नाहीं ओलखल व चुकीचं समजून त्याला वाटले की ती जागा आपल्याशी छळ करत आहे .त्यामुळं परशुरामांनी त्या जागेला श्राप दिला की सर्व दुःख पाप तुझ्यातच येतील .हे पाहून देवी रेणुका निराश होऊन त्या निवसात्ना बाहेर त्याच्यासोमार आली.हे पाहून भगवान परशुरामांना आपली चूक समजली व माते पाशी क्षमा याच ना केली पण मातेने क्रोधित होऊन इथनं जाण्यास सांगितला .आपल्या निराश मातेला क्षमा मागून तिला सांगितले की माझ्यामुळे तुझे स्थान अपवित्र झाले तर काळजी करू नकोस आई. या निवासस्थानी भविष्यात, जेव्हा तुझे भक्त तुमच्या मंदिरात दर्शनासाठी येतील, तेव्हा त्यांची सर्व पापे तुमच्याकडे येण्यापूर्वी त्या ठिकाणी निघून जातील आणि ती पापे तुमच्या चरणी येतील आणि ती शुद्ध होऊन पुण्याचे रूप धारण करतील. ते पुण्य दुसऱ्या तुझ्या भाग्यवान भक्ताला दिले जाईल. आणि येणाऱ्या काळात तुमच्या प्रत्येक नावाच्या शेवटी रेणुका असेल. या कारणामुळे आजही देवी पद्माक्षी त्रिपुरासुंदरीचे प्रत्येक नाव रेणुका म्हणून ओळखले जाते म्हणून पद्माक्षी "रेणुका" असे म्हणतात. देवीची मूर्ती "तांडला" स्वरुपात आहे.
पद्माक्षी रेणुका देवी ही सर्व कोकणी लोकाची देवी आहे कारण कोकणात जे सौंदर्य, वैभव, सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य हे सर्व तिच्या कृपे मुळे आहे याच कारणांमुळे देवीला अवघ्या कोकणची लक्ष्मी म्हणून ही ओळखले जाते. देवीने आपल्या शरीरावर सहस्त्र नयन असलेलं रूप म्हणजे शताक्षी धारण केलेलं आहे .याच स्वरूपामुळे देवी दर्यात जाणाऱ्या सर्व कोळी व तिचे भक्तागणांवर सदैव लक्ष ठेवून व नेहमी पाठीशी उभी आहे .याच मुळे देवीला भगवान परशूरामांनी देवी शताक्षी रेणुका म्हणून ही ओळखली जाशील असे सांगितले .देवीचे दोन्ही नाव पद्माक्षी म्हणजे पद्मकोषे आणि शताक्षी याच दुर्गा सप्तशती मधे उलेख अधळत.
देवस्थान संपादन
देवी पद्माक्षी रेणुका देवस्थान हे आलिबाग तालुक्यात कावाडे(आधीचे विरूमाला) इथे एका तलावाकाठी आहे.देवीचे मंदिर अजूनही बांधलेलं नाही पण ती निसर्गरम्य ठिकाणी तिचे पारंपरिक पद्धतीने कवलारू मंदीर आहे.भाविक लाखोच्या संख्येनं दरवर्षी इथे शारदीय नवरात्रीत व वैशाख शुद्ध पौर्णिमेला देवी आईच्या पालखी सोहळ्यात दर्शनासाठी येत असतात.मंदिरात जाण्याआधी भाविक भक्तांना मंदिराच्या पायथ्याशी लागणारी डोंगरातून येणाऱ्या शुद्ध निर्मळ गांगेतून पाय धुऊन जावा लागत .असे म्हणतात या गांगे मुळे भाविक भक्त शुद्ध होऊन मंदिरात भगवतीचे दर्शन आगदी शुद्ध मनानी प्राप्त होते.असे समजले जाते की भगवान मुकुंदभैरव म्हणजेच कनकेश्वर जे देवीच्या मागे असणाऱ्या डोंगरात वसलेलं स्थान आहे तिथून ही गंगा उत्पन्न झाली .हजारो भाविकांच श्रद्धास्थान असणारी ही देवी तांडला स्वरूपात आहे.ही देवी त्रिपुरसुंदरीचे शक्तीपूर्णा रूप मानले जाते.
हे स्थान त्रेतायुगात निर्माण झाले आहे असे म्हणतात.देवी भगवती इथे एका हातात कमळ तर दुसऱ्या हातात त्रिकाळ चिंतामणी खड्ग घेऊन कुंभासूराच्या मुडक्यवर पाय ठेवून वामश्टककी(सिंह) वर बसली आहे तिला कूंभासुरभयांकरि अशी तिची ओळख आहे.हे स्थान कोकणवासी लोकांची देवी अशी मानली जाते .अशी समज आहे की ज्या लोकांना आपली कुलदेवता माहिती नसेल त्या लोकांनी पद्माक्षी रेणुका देवीला आपले कुलदैवत मानून पुज्या केली तर ती त्यांच्या माहीत नसलेल्या कुलदैवता पर्यंत नक्की पोहचते आणि ही देवी भक्ताच्या नवसाला नक्की पावते अशी भाविकांची श्रद्धा आहे.
देवी पद्माक्षी रेणुका ही भारतातील १०८ आणि ५२ शक्तिपीठांपैकी एक मानली जाते . देवी ५२ पीठ उलेख हा शक्तीपीठ स्तोत्रामधे राकिणी शक्तीपीठ असे मिळते . तर १०९ शक्ती पीठ असल्याचा उलेख हा देवी भागवत पुराणात अरुंधती शक्तीपीठ असे मिळते.
सोहळा संपादन
पद्माक्षी रेणुका मंदिर ५२ किंवा १०८ पीठांपैकी सर्वात समर्पित शक्तीपीठ आहे. मंदिरात साजरे होणारे सण म्हणजे शारदीय नवरात्री आणि वैशाख शुद्ध पौर्णिमा. वैशाख शुद्ध पौर्णिमेला हजारो पेक्षा जास्त भाविक देवी भगवतीच्या दर्शनासाठी येतात. तसेच नवरात्रीत लाखो लोक तिथे भेट देतात.
- ^ "Shakti Pithas of Maharashtra". VHP. Archived from the original on 2015-04-29.