पंजाब विधानसभा निवडणूक, २०१७
२०१७ सालची पंजाब विधानसभा निवडणूक ही भारताच्या पंजाब राज्यातील एक विधानसभा निवडणूक होती. ४ फेब्रुवारी २०१७ रोजी घेतल्या गेलेल्या ह्या निवडणुकीमध्ये पंजाब विधानसभेमधील सर्व ११७ जागांसाठी नवे आमदार निवडण्यात आले. मागील निवडणुकीत प्रकाशसिंग बादल ह्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ६८ जागांसह बहुमत मिळाले होते. ह्या निवडणुकीत काँग्रेससोबत आम आदमी पार्टीचा देखील जोर होता.
| |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
| |||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||||
|
११ मार्च २०१७ रोजी मतगणना केली गेल्यावर काँग्रेस पक्षाला ७७ जागा मिळाल्याचे निष्पन्न झाले. अकाली दल व भाजप युतीला जोरदार पराभवाचा सामना करावा लागला. आम आदमी पार्टीला देखील अपेक्षित यश मिळाले नाही.
संपूर्ण निकाल
संपादनपक्ष | जागा लढवल्या | विजय | बदल | मते | मतांची टक्केवारी | बदल |
---|---|---|---|---|---|---|
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस | 117 | 77 | ▲31 | 5,945,899 | 38.5% | ▼1.42% |
आम आदमी पार्टी | 112 | 20 | ▲20 | 3,662,665 | 23.7% | - |
शिरोमणी अकाली दल | 94 | 15 | ▼41 | 3,898,161 | 25.2% | ▼9.36% |
भारतीय जनता पक्ष | 23 | 3 | ▼09 | 833,092 | 5.4% | ▼1.75% |
लोक इन्साफ पार्टी | 5 | 2 | ▲2 | 189,228 | 1.2% | - |
अपक्ष | 0 | ▼3 | 323,243 | 2.1% | ▼5.03% | |
नोटा | 108,471 | 0.7% | ▲0.7% | |||
एकूण | 117 | - | ||||
मतदान:78.6% | ||||||
स्रोत: Election Commission of India Archived 2014-12-18 at the Wayback Machine. |