पंचरंगी सूर्यपक्षी
शास्त्रीय नाव |
Nectarinia zeylonica, Leptocoma zeylonica |
---|---|
कुळ | शिंजिराद्य (Nectariniidae) |
अन्य भाषांतील नावे | |
इंग्लिश | Purple-rumped Sunbird |
हिंदी | शक्कर खोरा |
आकार
संपादनपंचरंगी सूर्यपक्षी हा चिमणीपेक्षा लहान अंदाजे १० सें. मी. आकाराचा असतो. नराचे डोके, छातीचा भाग हिरवा, नारिंगी, जांभळ्या रंगाचे मिश्रण असते तर मागील भाग निळसर जांभळा, पोटाखालचा भाग पिवळा. तर मादीचा वरून तपकिरी रंग, खालून फिकट पिवळा, काळे पंख, साधारण जांभळ्या सूर्यपक्षी मादी सारखीच फक्त गळा राखाडी-पांढरा, पोटाखालाचा भाग जास्त पिवळा.
वास्तव्य/आढळस्थान
संपादनसातपुड्याच्या दक्षिण भागात (भारतीय द्वीपकल्प) श्रीलंका, बांगलादेश इ. ठिकाणी याचे वास्तव्य आहे.
प्रजनन काळ
संपादनसाधारणपणे मार्च ते मे हा वीण हंगाम असून मादी एकावेळी २ ते ३ अंडी देते, मादी एकटीच घरटे बांधण्याचे, अंडी उबविण्याचे काम करते मात्र पिलांना खाऊ घालण्याचे काम नर-मादी मिळून करतात.याचे घरटे जांभळ्या सूर्यपक्षी सारखेच लटकणारे असते,
चित्रदालन
संपादन-
नर
-
नर
-
नर
-
नर
-
मादी
-
घरट्याजवळ मादी
-
शहरातील बागेत दिसणारा सूर्यपक्षी
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |