न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९७१-७२
न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९७२ दरम्यान तीन महिला कसोटी सामने खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. न्यू झीलंडच्या महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाचे माउरीन पेन हिने नेतृत्व केले. कसोटी मालिका न्यू झीलंड महिलांनी १-० अशी जिंकली. ह्या मालिकेनंतर दक्षिण आफ्रिका महिलांनी थेट १९९७ मध्ये आंतरराष्ट्रीय सामना खेळला.
न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, १९७१-७२ | |||||
दक्षिण आफ्रिका महिला | न्यू झीलंड महिला | ||||
तारीख | २५ फेब्रुवारी – २७ मार्च १९७२ | ||||
संघनायक | माउरीन पेन | ट्रिश मॅककेल्वी | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | न्यू झीलंड महिला संघाने ३-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
सराव सामने
संपादनमहिला कसोटी मालिका चालु असतानाच मध्ये न्यू झीलंड महिलांनी ६ सराव सामने खेळले ज्यातले ३ सामने जिंकण्यात न्यू झीलंड महिलांना यश आले तर ३ सामने अनिर्णित राहिले.
- १९-२१ फेब्रुवारी १९७२, ट्रान्सवाल महिला वि. न्यू झीलंड महिला, वॉन्डरर्स स्टेडियम, जोहान्सबर्ग, अनिर्णित, धावफलक
- २३ फेब्रुवारी १९७२, पश्चिम प्रांत महिला वि. न्यू झीलंड महिला, स्टेलेनबॉश, अनिर्णित, धावफलक
- ३-४ मार्च १९७२, दक्षिण आफ्रिका महिला XI वि. न्यू झीलंड महिला, सेंट जॉर्जेस ओव्हल, पोर्ट एलिझाबेथ, अनिर्णित, धावफलक
- ६-७ मार्च १९७२, दक्षिण आफ्रिका महिला आमंत्रण XI वि. न्यू झीलंड महिला, जॅन स्मट्स मैदान, ईस्ट लंडन, न्यू झीलंड महिला ७ गडी राखून विजयी, धावफलक
- १५-१६ मार्च १९७२, नताल महिला वि. न्यू झीलंड महिला, किंग्जमेड, डर्बन, न्यू झीलंड महिला १ डाव आणि ७५ धावांनी विजयी, धावफलक
- १८ मार्च १९७२, ट्रान्सवाल 'ब' महिला वि. न्यू झीलंड महिला, मार्क्स स्पोर्ट्स क्लब मैदान, जोहान्सबर्ग, न्यू झीलंड महिला ६ गडी राखून विजयी, धावफलक
महिला कसोटी मालिका
संपादन१ली महिला कसोटी
संपादन२५-२८ फेब्रुवारी १९७२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: न्यू झीलंड महिला, फलंदाजी.
- न्यू झीलंड महिलांचा दक्षिण आफ्रिकेत पहिला महिला कसोटी सामना.
- न्यू झीलंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन देशांमधला पहिला महिलांचा कसोटी सामना.
- बेव्हर्ली बोथा, कॅरॉल गिल्डेनहुज, मोईरा जोन्स, डॉन रे, विआ स्कॉग, जुआनिटा व्हान झील, डेनिस वेयेर्स, ग्लोरिया विल्यमसन (द.आ.) आणि एथ्ना रौस (न्यू) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.
२री महिला कसोटी
संपादन१०-१३ मार्च १९७२
धावफलक |
वि
|
||
- नाणेफेक: दक्षिण आफ्रिका महिला, क्षेत्ररक्षण.
- मायर्ना कॅट्स, ब्रेंडा विल्यम्स (द.आ.) आणि कॅरॉल मॅरेट (न्यू) या सर्वांनी महिला कसोटी पदार्पण केले.