नोटा (मतदान)
नोटा (NOTA) म्हणजे 'None Of The Above' या इंग्रजी शब्द समूहाचे संक्षिप्त रूप होय. एखाद्या विशिष्ट निवडणुकीत पात्र मतदारातर्फे, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र वापरून मतदान करतांना हा पर्याय वापरण्याची भारतात मुभा आहे. यंत्राचे वर डकविलेल्या यादीतील उमेदवारांपैकी, कोणत्याही उमेदवाराला मत द्यावयाचे नसल्यास वरीलपैकी कोणीही नाही हा पर्याय वापरण्यासाठी या बटण(कळ)चा उपयोग केला जातो. ही कळ इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात उमेदवारांच्या यादीचे सर्वात शेवटी असते. 1990च्या दशकापासून मात्र इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन वापरण्यात येऊ लागले, परंतु नोटा यंत्रात येण्यासाठी २०११ हे वर्ष उजडावे लागले. अशाप्रकारचे मतदान करताना यंत्राचा वापर सुरू झाल्याने अनेक बाबी साध्य झाल्या. ईव्हीएम मशीनवर दर्शवलेल्या उमेदवारांपैकी कोणालाही मत द्यायचे नसेल तर, वरीलपैकी कोणीही नाही 'NOTA' हा पर्याय देता येणे मतदारांना शक्य झाले. जर नोटा हा पर्याय निवडलेल्या मतदारांची संख्या ही अधिक असेल तर, ती निवडणूक रद्द होते व निवडणूक पुन्हा घेण्यात येते. [१]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ
संपादन- ^ भारताच्या निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांच्या पुस्तिकेतील कलम 4.4(b)- None of the Above’ :NOTA HANDBOOK FOR CANDIDATES (इंग्रजी मजकूर) Check
|दुवा=
value (सहाय्य). दि. ०७/०२/२०१४ रोजी पाहिले.|ॲक्सेसदिनांक=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)