मतदान
मतदान ही एखाद्या गटास अथवा समूहास, विशिष्ट निवडणुकीसाठी अथवा एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी लिखित अथवा ठरविलेल्या माध्यमाद्वारे (जसे: मतदान यंत्र इत्यादी.) मतप्रदर्शन करण्याची एक पद्धती आहे. याचा वापर चर्चा, वादविवाद अथवा निवडणूक प्रचारानंतर करण्यात येतो. लोकशाही राज्य प्रणालीत उच्च पदावरच्या व्यक्तिंसाठी निवडणूक घेऊन मतदान करण्यात येते.एखाद्या क्षेत्रातील अशा निवडणुकीसाठी ज्याला मतदान करण्यात येते तो उमेदवार असतो व जो मतपत्रिकेद्वारे अथवा ठरवून दिलेल्या पद्धतीद्वारे मतदान करतो तो मतदार म्हणून ओळखण्यात येतो. मतदारांनी केलेल्या मतांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची निवड केली जाते. आपल्याला जरूर मत दिले पाहिजे.
राजकारणात
संपादनलोकशाहीत, निवडणुकीद्वारे सरकारची निवड करण्यात येते. यासाठी ईच्छुक उमेदवारांमधून निवड करावयाची असते. वेगवेगळ्या देशात,तेथील सरकारने व नागरिकांनीनी ठरविलेल्या मतदान करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत.
मत हे वैयक्तिक आवडीचे प्रगटीकरण असते. कोणत्याही सरकारमध्ये अथवा संस्थेमध्ये अथवा गटांमध्ये, एकमत न होणाऱ्या एखाद्या प्रस्तावावर मतदान घेऊन तो प्रस्ताव, झालेले मतदान बघुन स्वीकारण्यात अथवा नाकारण्यात येतो.मतदान हे काही देशात मतदान केंद्रावर जाऊन करण्यात येते तसेच काही देशात ते ऐच्छिक तर काही देशात ते अनिवार्य आहे.
गुप्त मतदान
संपादनएखाद्या मतदाराने प्रगट केलेल्या मताची जाहिर वाच्यता होऊ नये म्हणून गुप्त मतदान घेण्यात येते. तसेच, मतदानानंतर, विरोधी मतदान केले म्हणून, उमेदवाराने मतदारांना भिवविण्यास अथवा त्रास देण्यास वाव मिळू नये यासाठी अशी सोय केलेली असते.
निवडणूक प्रेरणा
संपादन
nivadnuk prerana