नेहा जोशी

भारतीय चित्रपट अभिनेत्री (जन्म १९८६)

नेहा जोशी ( ७ डिसेंबर १९८६)[] ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. ती पुण्यात जन्मली आणि मोठी झाली, ती मराठी चित्रपटसृष्टीतल्या तिच्या कामगिरीसाठी प्रसिद्ध आहे.

तिच्या कामांमध्ये झेंडा (२०१०) आणि पोस्टर बॉईझ (२०१४) यांचा समावेश आहे. पोस्टर बॉईझ मधील भूमिकेबद्दल तिला समीक्षकांकडून कौतुक मिळाले. नेहा जोशी अँड टीव्ही वरील एक महानायकः डॉ. बी.आर. आंबेडकर या हिंदी मालिकेत बाबासाहेब आंबेडकरांची आई भीमाबाई सकपाळ यांची भूमिका बजावते.[]

सुरुवातीचे जीवन

संपादन

तिच्या कॉलेजच्या काळात तिने आंतर-महाविद्यालयीन नाटक स्पर्धांमध्ये सक्रियपणे भाग घेतला. व्यावसायिक अभिनय रंगमंच नाटक क्षण एक पुरे आणि दूरचित्रवाणी कारकिर्दीपासून तिने २००० मध्ये ओं पाऊस या मराठी मालिकांमधून अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली.

कारकीर्द

संपादन

तिने विविध मराठी चित्रपट, व्यावसायिक नाटकं आणि मराठी दूरदर्शन मालिकांत काम केले. काही हिंदी चित्रपटांतही तिने अभिनय केला. समीर पाटील दिग्दर्शित पोस्टर बॉईझ या मराठी चित्रपटातील तिच्या भूमिकेला समीक्षकांचे कौतुक मिळाले. २०१६ मध्ये तिने उकाली’ या मराठी शॉर्ट फिल्मची निर्मिती देखील केली. तिने का रे दुरावा या झी मराठी वरच्या मालिकेत रजनी ही खलनायकी व्यक्तिरेखा साकारली.

चित्रपट आणि टीव्ही मालिका

संपादन
वर्ष चित्रपट भाषा
२००९ झेंडा मराठी
२००९ सुंदर माझं घर मराठी
२०१२ स्वप्न तुझेनी माझे मराठी
२०१३ जब लव्ह हुआ हिंदी
२०१३ प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं मराठी
२०१३ बच के जरा भूत बंगले में हिंदी
२०१४ हवा हवाई हिंदी
२०१४ पोस्टर बॉईझ मराठी
२०१४ सॅटर्डे संडे मराठी
२०१५ ड्रीम मॉल मराठी
२०१५ सच्चाईनी जीत गुजराती
२०१६ पोस्टर गर्ल मराठी
२०१६ लालबागची राणी मराठी
२०१७ बघतोस काय मुजरा कर मराठी
२०१८ वन नाइट आऊट हिंदी
२०१८ फर्जंद मराठी
२०१९ नशीबवान मराठी
२०२० मिडियम स्पायसी[] मराठी
वर्ष टी.व्ही. मालिका भूमिका भाषा
२०१४-२०१६ का रे दुरावा रजनी मराठी
२०१९-२०२० एक महानायकः डॉ. बी.आर. आंबेडकर भीमाबाई आंबेडकर हिंदी

संदर्भ

संपादन
  1. ^ "Neha Joshi". marathi.tv. 11 October 2017 रोजी पाहिले.
  2. ^ "'Ek Mahanayak - Dr. B.R. Ambedkar' actor Neha Joshi says, 'I've always been experimental at heart' - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया.
  3. ^ "Neha Joshi and Pushkaraj Chirputkar join 'Medium Spicy'". www.sakaltimes.com (इंग्रजी भाषेत). 2019-09-09. 2020-03-24 रोजी पाहिले.[permanent dead link]

बाह्य दुवे

संपादन