हे एक लोकाचाराचे स्वरूप आहे. प्रत्येक धर्मात माणसाने कोणती कृत्ये करू नयेत याचीही बंधने घालून दिलेली असतात.त्या बंधनांना निषिद्ध आचार असे म्हणले जाते. हिंदू धर्मात गोमांस भक्षण, एकादशीच्या दिवशी भोजन करणे , महिलांनी कार्तिकस्वामींचे दर्शन घेणे , चातुर्मासात कांदे किंवा वांगे खाणे, श्रावण महिन्यात मांस खाणे किंवा मद्यपान करणे,इत्यादींचा निषेध व्यक्त केला आहे.सध्याच्या विज्ञान युगात निषिद्ध आचारांची पकड बरीच सैल झाल्यासारखी दिसत आहे.