निळ्या टोपीचा कस्तूर
वर्णन
संपादननिळ्या टोपीचा कस्तूर हा पक्षी साधारण १७ सें. मी. आकाराचा आहे. यातील नर पाठीकडून गडद निळा आणि काळा, डोके व कंठ निळा, पोटाकडून तांबूस-पिंगट असा आहे. नर उडतांना त्याच्या पंखावर पांढरा पट्टा दिसतो. मादी पाठीकडून फिकट तपकिरी, पोटाकडून पांढुरकी आणि गर्द तपकिरी अशी आहे.
वास्तव्य/आढळस्थान
संपादनपानगळीची आर्द्र जंगले, सदाहरित मध्यम आकाराची जंगले, कॉफीच्या लागवडीची क्षेत्रे आणि दाट बांबूच्या जंगलात राहणारा हा पक्षी हिवाळ्यात जवळजवळ संपूर्ण भारतभर तर उन्हाळ्यात काश्मीर, हिमालयातील १००० ते ३००० मी. उंचीपर्यंतच्या क्षेत्रात, अरुणाचल प्रदेश, नागालॅंड, मेघालय या ठिकाणी आढळतो.
खाद्य
संपादनजमिनीवर आणि झाडांवर आढळणारे विविध कीटक या पक्ष्याचे खाद्य आहे.
प्रजनन काळ
संपादननिळ्या टोपीचा कस्तूर या पक्ष्याचा प्रजनन काळ साधारण एप्रिल ते जून असून झाडांच्या ढोलीत किंवा कडेकपारीत गवत आणि विविध पानांनी घरटे बनविले जाते. मादी एकावेळी ४ ते ६ गुलाबी-पांढऱ्या रंगाची त्यावर फिकट लाल-तांबड्या रेषा असलेली अंडी देते.
चित्रदालन
संपादनहा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |