निखिल चव्हाण

भारतीय अभिनेता


निखिल चव्हाण हा एक भारतीय चित्रपट अभिनेता आहे जो मराठी भाषेतील चित्रपट आणि मालिकांमधील कामांसाठी प्रसिद्ध आहे. निखिलचा जन्म २९ मे १९९२ रोजी पुण्यात झाला होता. निखिल हा झी फाईव्हच्या ओरिजिनल फिल्म वीरगती आणि मराठी मालिका लागिरं झालं जी साठी प्रसिद्ध आहे. त्याने सर्वाधिक लोकप्रिय वेब सिरीज स्ट्रीलिंग पुलिंगमध्ये मुख्य भूमिका निभावली होती आणि निखिल याला लागिरं झालं जी मालिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०१७मध्ये मिळाला होता.

निखिल चव्हाण
झी युवा सन्मान २०१८ येथे निखिल चव्हाण
जन्म २९ मे, १९९२ (1992-05-29) (वय: ३२)
पुणे, महाराष्ट्र, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
पेशा अभिनय
धर्म हिंदू

निखिलने पुणे येथील एएम कॉलेजमध्ये शैक्षणिक अभ्यास पूर्ण केला. त्याने महाविद्यालय सुरू केल्यापासून नाटक, स्पर्धांमध्ये सक्रियपणे भाग घेऊ लागला.

चित्रपट, वेब मालिका, मालिका आणि नाटके

संपादन

चित्रपट

संपादन
वर्षे शीर्षक भूमिका भाषा नोट्स
२०१८ अत्याचार खलनायक मराठी [१]
२०१९ गर्ल्स आदित्य मराठी पाहुणा
२०१९ धोंडी चंप्या: एक प्रेम कथा मराठी चित्रीकरण Archived 2019-11-05 at the Wayback Machine.

वेब मालिका

संपादन
वर्षे शीर्षक भूमिका भाषा नोट्स
२०१९ वीरगती ( झी ५ मूळ चित्रपट ) सलीम शेख मराठी, हिंदी [२]
२०१९ स्ट्रिलिंग पुलिंग सचिन मराठी [३]

मालिका

संपादन
वर्षे शीर्षक भूमिका वाहिनी
२०१७-२०१८ लागिरं झालं जी विक्रम राऊत (विक्या) झी मराठी
२०१८ जलोष गणरायाचा सूत्रसंचालक झी मराठी
२०२०-२०२१ कारभारी लयभारी राजवीर सूर्यवंशी (वीरु) झी मराठी

नाटके

संपादन

• थ्री चिअर्स

• रायगडाला जेव्हा जाग येते

• पती सगळे उचापती

• इथे ओशाळला मृत्यू

पुरस्कार

संपादन
वर्ष पुरस्कार वर्ग शीर्षक निकाल
२०१७ झी मराठी अवॉर्ड्स सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता लागिरं झालं जी विजेता