नासक हिरा
नासक हिरा हा १५ व्या शतकात सापडलेला ४३.३८ कॅरेटचा हिरा आहे. हा आंध्र प्रदेशातील, कोल्लूर जवळील आमरागिरी खाणीत सापडला होता. हा हिरा पैलु पाडल्या नंतर नाशिक जवळील त्र्यंबकेश्वराच्या मुकुटावर १५ व्या शतकापासुन इ.स १८१७ पर्यत होता. त्यानंतर तो ब्रिटिशांनी पेशव्यांकडून जबरीने लूटला आणि इंग्लंडला पाठवला. या हिऱ्याला जगातील तीस महान हिरे यातील एक महत्त्वाचा हिरा एक म्हणून दर्जा देण्यात आला आणि न्यू यॉर्क शहरातील पार्के-बर्नेट गॅलरीमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. सध्या हा हिरा लेबनॉनमधील एका खाजगी संग्रहालयात ठेवण्यात आला आहे. हा हिरा परत आणून भारतीय त्र्यंबकेश्वर मंदिरात स्थापन करण्याची मागणी आहे.
43.38 carats (8.676 g) diamond | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | हिरा | ||
---|---|---|---|
मूळ देश | |||
मालक संस्था |
| ||
Time of discovery or invention | |||
| |||
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |