कोल्लूर हे कर्नाटकच्या उडुपी जिल्ह्यातील एक गाव आहे.या गावाजवळसह्याद्रीची (पश्चिमी घाट) कुटजाद्री पर्वतमाला आहे. हे गाव मुकाम्बिका देवीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.हे ठिकाण कुंदनपूर या गावापासून सुमारे ३८ किमी.वर आहे.या मुकाम्बिका देवीस दुर्गा देवीचे एक रूप समजल्या जाते.या देवीने मुकासूर दैत्याचा वध केला म्हणून हिला हे नाव पडले.ही देवी कर्नाटक,केरळतमिळनाडूच्या अनेकांचे श्रद्धास्थान व कुलदैवत आहे.

मुकाम्बिका देवीचे मंदिर
मुकाम्बिका देवीच्या मंदिरातील आतील दृश्य
मुकाम्बिका देवीच्या पंचधातू मूर्तीची स्थापना आदी शंकराचार्यांनी केली अशी धारणा आहे.