नारायणपूर महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे. हे गाव पुणे शहरापासून अंदाजे ३० किमी अंतरावर वसले आहे.

वैशिष्ट्ये

संपादन

येथे यादवकालीन नारायणेश्वराचे भव्य मंदिर असून त्यावरील शिल्पकाम प्रेक्षणीय आहे. हठयोगी चांगदेवांचे हे निवासस्थान होते. दत्तस्थान म्हणूनही हे ठिकाण प्रसिद्ध आहे. येथून जवळच ऐतिहासिक पुरंदर किल्ला आहे.