क्वाझुलू-नाताल
(नाताळ वसाहत या पानावरून पुनर्निर्देशित)
क्वाझुलू-नाताल हा दक्षिण आफ्रिका देशाचा एक प्रांत आहे. क्वाझुलू-नातालच्या पूर्वेस हिंदी महासागर, उत्तरेस स्वाझीलँड व मोझांबिक तर पूर्वेस लेसोथो हे देश आहेत. पीटरमारित्झबर्ग ही क्वाझुलू-नातालची राजधानी तर डर्बन हे सर्वात मोठे शहर आहे. १९९४ सालापर्यंत हा प्रांत नाताल ह्या नावाने ओळखला जात असे. येथे झुलू वंशाचे लोक मोठ्या प्रमाणावर वास्तव्यास आहेत.
क्वाझुलू-नाताल KwaZulu-Natal | |
दक्षिण आफ्रिकेचा प्रांत | |
क्वाझुलू-नातालचे दक्षिण आफ्रिका देशामधील स्थान | |
देश | दक्षिण आफ्रिका |
स्थापना | २७ एप्रिल १९९४ |
राजधानी | पीटरमारित्झबर्ग |
सर्वात मोठे शहर | डर्बन |
क्षेत्रफळ | ९४,३६१ चौ. किमी (३६,४३३ चौ. मैल) |
लोकसंख्या | १,०२,६७,३०० |
घनता | ११० /चौ. किमी (२८० /चौ. मैल) |
आय.एस.ओ. ३१६६-२ | ZA-KZN |
संकेतस्थळ | kwazulunatal.gov.za |
नाताल, ब्राझील याच्याशी गल्लत करू नका.
१९व्या शतकाच्या पूर्वार्धादरम्यान हा भूभाग झुलू राजतंत्राच्या अधिपत्याखाली होता. १९९४ साली दक्षिण आफ्रिकन सरकारने वर्णभेद काळात तयार केलेल्या क्वाझुलू भूभागाला नाताल प्रांतामध्ये विलीन करून क्वाझुलू-नाताल प्रांताची निर्मिती केली.