नाट्यदर्पण ही मुंबईतील एक नाटक या विषयाला वाहिलेली संस्था होती. ही संस्था इ.स. १९८२पासून 'कल्पना एक आविष्कार अनेक' नावाची एकांकिका स्पर्धा घेत असे. कोणीएक मान्यवर स्पर्धकांना एक कल्पना देत आणि त्या कल्पनेवर आधारित स्पर्धक अनेकानेक नाट्याविष्कार सादर करीत. यात मुख्यत्वे लेखकाच्या मेंदूला व्यायाम मिळत असे. तो कल्पनेचा कसा विस्तार करतो, तिला कसे फुलवतो आणि आपल्या प्रतिभेने सगळा नाट्यखेळ कसा रचतो, हे पाहणे हाच यातला मनोज्ञ भाग होता. एकूण १७ वर्षे अशी स्पर्धा घेतल्यानंतर नाट्यदर्पण ही संस्था बंद झाली.

त्यानंतर २००४ सालापासून 'अस्तित्त्व' या संस्थेने ही स्पर्धा पुन्हा सुरू केली आणि पुढे आठ वर्षांनी २०११मध्ये स्पर्धेची रजतजयंती साजरी केली.

’नाट्यदर्पण’चे श्री.सुधीर दामले हे त्याकाळी 'नाट्यदर्पण' नावाचे एक मासिकही चालवत असत. त्याला जोडून त्यांनी 'नाट्यदर्पण रजनी' सुरू केली होती. मराठी नाट्य आणि चित्रपट क्षेत्रातल्या विविध कलाकारांना त्या सोहळ्यात पुरस्कार दिले जात. हिंदी सिनेमाच्या क्षेत्रात 'फिल्मफेअर ॲवॉर्ड्‌स'चे जे स्थान आहे तेच मराठी कलाजगतात या 'नाट्यदर्पण सन्मानचिन्हां'ना मिळाले होते. त्या रजनीचा भव्य आणि दिमाखदार सोहळा दर वर्षी साजरा होत असे. १९८१साली या कार्यक्रमातून आनंद भाटे या दशवर्षीय बालकलाकाराच्या गाण्याचा पहिला जाहीर कार्यक्रम झाला.

अशा नाट्यदर्पण पुरस्काराने सन्मानित झालेले गुणवंत

संपादन