नांदेड-बिदर रेल्वेमार्ग

बिदर येथे अनेक ऐतिहासिक गुरुद्वारे आहेत, त्यामुळे नांदेडच्या तख्त सचखंड श्री हुजुर अबचलनगर साहिब गुरुद्वाऱ्याला भेट देणाऱ्या पर्यटकांना लगेच बिदरच्या नानक झिरा साहिब [१] गुरुद्वाऱ्याचे दर्शन होण्यासाठी तसेच बेंगळूरुचे अंतर कमी होण्यासाठी हा मार्ग महत्त्वाचा ठरतो. हुजूर साहेब नांदेड पासून कर्नाटकमधील बिदर शहरापर्यंत हा लोहमार्ग पोहचतो. प्रस्तावित नांदेड-बिदर या नव्या रेल्वेमार्गाची एकूण लांबी १५७.०५० किलोमीटर असून त्यापैकी १००.७५ किमी मार्ग महाराष्ट्रातील आहे आणि उर्वरित ५६.३० कि.मी. मार्ग कर्नाटकमध्ये आहे. या सरळ रेल्वेमार्गामुळे बिदर ते नांदेड हे अंतर १४५ कि.मी.ने कमी होईल.


  • लोहमार्गावरील प्रस्तावित स्थानके
  1. हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानक
  2. मुगट जंक्शन रेल्वे स्थानक
  3. आमदूरा (मारतळा)
  4. कृष्णुर/कामळज (माळकौठा)
  5. नायगांव
  6. नरसी-कामरसपल्ली
  7. बेटमोगरा (माऊली)
  8. आदमपूर
  9. खानापूर जं.
  10. देगलूर जं.(बोधन-लातूररोड रेल्वेमार्ग)
  11. करडखेड
  12. मरखेल
  13. हाणेगांव
  14. औराद
  15. संतपूर (हौदगाव)
  16. जानवाडा(धृपत-माणगांव)
  17. बालूर
  18. हलबर्गा
  19. बिदर

लातूररोड ते बोधन मार्गे जळकोट-मुखेड-बिलोली रेल्वेमार्ग प्रस्तावित आहे. सदरील मार्ग हा १३० किलोमीटर अंतराचा असून या रेल्वे मार्गावर कुठेही नदी, पर्वत किंवा अडथळ्याचे ठिकाण नसून सरळ मार्ग आहे. देगलूर स्थानकावर संभावित जंक्शन तयार होईल. या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेऊन जनतेच्या हितासाठी हा दोन जिल्ह्यांना,५ मंडळांना जोडणारा रेल्वे मार्ग सुरू व्हावा.