हुजूर साहेब
नांदेड येथील गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजुर अबचलनगर साहिब या भल्यामोठ्या नावांने पण ओळखला जातो. येथे शीख धर्मियांचे १०वे गुरू श्री गुरू गोविंदसिंहजी यांची समाधी आहे. गुरूद्वाऱ्याची सध्याची इमारत महाराजा रणजीत सिंग यांनी इ.स. १८३० मध्ये बांधली. हे शीखांच्या पाच तक्तांपैकी एक आहे. हा गुरुद्वारा श्री. गुरू गोविंदसिंघ यांच्या समाधीवर बांधलेला आहे . गुरूद्वाऱ्याच्या आतल्या खोलीला अंगीथा साहिब असे म्हणले जाते. या गुरूद्वाऱ्याचे बांधकाम इ. सन १८३२ ते १८३७ मध्ये झाले आहे.