नांदुरकी

(नांदरु़ख या पानावरून पुनर्निर्देशित)

नांदरुख, नांद्रुक किंवा नांदुरकी हा एक मोठा वृक्ष आहे.

देहूला संत तुकाराम महाराज जेथून वैकुंठाला गेले, त्या स्थानावर नांदुरकीचे एक झाड आहे. तुकाराम बिजेला बरोबर दुपारी १२:०२ वाजता तुकाराम वैकुंठाला गेले, त्या वेळी हा नांदुरकीचा वृक्ष प्रत्यक्ष हलतो, असे सांगितले जाते. संत तुकाराम महाराज हे देहू या गावी जन्मले. संत तुकाराम महाराजांना "जगदगुरू" असे संबोधले जाते. जगदगुरू तुकाराम महाराज हे सदैव "हरिनामात" गढलेले असायचे. होळी नंतर लगेच दुसऱ्या दिवशी "तुकाराम बीज" हा दिवस येतो. याच दिवशी जगदगुरू तुकाराम महाराज हे नांदुरकी वृक्षाच्या छायेखाली ध्यानस्त बसून सदेह वैकुंठधामाला गेले. वैकुंठधाम म्हणजे साक्षात "श्री हरि भगवान विष्णू" यांचे धाम. जगदगुरू तुकाराम महाराज यांच्या नावातच "राम" आहे. हे नांदुरकी वृक्ष तुकाराम बीजेला बरोबर १२.०२ला हलते. खरचं हे जगातील सर्वात मोठे आश्चर्य असावे. "मनुष्याच्या रूपात जन्माला येऊन केवळ आपल्या कर्तुत्वाने व भक्तीने देवत्वाला प्राप्त करणे ही खूप मोठी गोष्ट आहे". "छत्रपती शिवाजी महाराज" यांच्यासारख्या एक युगप्रर्वतक महापुरुषाणे तुकाराम महाराज यांचे आशीर्वाद घेऊन आपल्या कार्याला सुरुवात केली होती. खरचं तुकाराम महाराज हे "जगदगुरू" होते...

नांदुरकीच्या झाडाचा उल्लेख असलेले एक मराठी चित्रपटगीत

संपादन

एक होता चिमणा, एक होती चिमणी ।
नांदुरकीच्या झाडावर त्यांची झाली ओळखदेख ।। ... (चित्रपट - सुखाची सावली; गीतकार - ग.दि. माडगूळकर; गायिका - सुमन कल्याणपूर, अपर्णा मयेकर; संगीतकार - दत्ता डावजेकर)


 
नांदरुखाचे रोप