नवा करार

(नवीन करार या पानावरून पुनर्निर्देशित)

नवा करार (ग्रीक: Καινὴ Διαθήκη, इंग्रजी: NEW TESTAMENT) म्हणजे ख्रिश्चन धर्मातील बायबलसंबंधित ग्रंथसंभाराच्या दोन भागांपैकी दुसऱ्या, तुलनेने उत्तरकालीन भागातील ग्रंथांचा संच होय. पहिल्या भागातील संच जुना करार या नावाने ओळखला जातो. नव्या कराराला ग्रीक नवा करार किंवा नवा कायदा या नावांनीही उल्लेखले जाते.