नवजीवन एक्सप्रेस भारतीय रेल्वेची अहमदाबाद आणि चेन्नई सेंट्रल रेल्वे स्थानकांदरम्यान धावणारी गाडी आहे.

ही गाडी १९७८साली सुरू झाली. त्यावेळी ती आठवड्यातून एकदा मद्रास बीच आणि अहमदाबाद दरम्यान धावत असे. त्यावेळी १४५/१४६ क्रमांक असलेली ही गाडी मंगळवारी सकाळी ६ वाजता चेन्नईहून निघे आणि बुधवारी संध्याकाळी ५:३० वाजता अहमदाबादला पोचत असे. परतीच्या प्रवासाला गुरुवारी पहाटे ६:५० सुरुवात होत असे व शुक्रवारी संध्याकाळी ७:५० वाजती ती मद्रास बीच येथे पोचत असे. त्यावेळी हिचा मार्ग चेन्नई-रेणिगुंटा-वाडी जंक्शन-दौंड-मनमाड-जळगाव-सुरत-वडोदरा-अहमदाबाद असा असे.

आता १२६५५/१२६५६ क्रमांकानी धावणारी ही गाडी चेन्नई-विजयवाडा-वारंगळ-वर्धा-जळगाव-सुरत-वडोदरा-अहमदाबाद अशी धावते.

नवजीवन एक्सप्रेसला २४ डबे असतात.