नरसिंग यादव
नरसिंग पंचम यादव (६ ऑगस्ट, इ.स. १९८९:उत्तर प्रदेश, भारत - )हा भारताचा कुस्तीगीर आहे. त्याने २००८ मध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. राष्ट्रकुल स्पर्धेत यश मिळवल्यामुळे त्याची महाराष्ट्र पोलीसमध्ये थेट पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. जगमल सिंग हे त्याचे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या मुंबई सेंटरमधील प्रशिक्षक आहेत. २०१२ लंडन ऑलिंपिकसाठी त्याची फ्रीस्टाईल कुस्तीच्या ७४ किलो वजनी गटामध्ये भारताकडून निवड झाली.
वैयक्तिक माहिती | |||||||||||||||||||||
---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|---|
पूर्ण नाव | नरसिंग पंचम यादव | ||||||||||||||||||||
राष्ट्रीयत्व | भारतीय | ||||||||||||||||||||
निवासस्थान | मुंबई, भारत | ||||||||||||||||||||
जन्मदिनांक | ६ ऑगस्ट, इ.स. १९८९ | ||||||||||||||||||||
जन्मस्थान | उत्तर प्रदेश, भारत | ||||||||||||||||||||
खेळ | |||||||||||||||||||||
देश | भारत | ||||||||||||||||||||
खेळ | कुस्ती | ||||||||||||||||||||
खेळांतर्गत प्रकार | फ्रीस्टाईल कुस्ती | ||||||||||||||||||||
प्रशिक्षक | जगमल सिंग | ||||||||||||||||||||
|
नरसिंग यादव (अभिनेता) याच्याशी गल्लत करू नका.
हा २०१० राष्ट्रकुल खेळ-संबंधित लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |