नमामि गंगे कार्यक्रम

नमामि गंगे कार्यक्रम हे भारतातील गंगा नदीला पूर्ववत् निर्मळ व प्रदूषणरहित बनविण्याचे अभियान आहे. या योजनेअंतर्गत गंगोत्री ते गंगासागर पर्यंतच्या गंगेला निर्मळ करण्याचे अभियान सुरू झाले आहे. या कामासाठी आर्थिक अंदाजपत्रकमध्ये २०,००० कोटी रुपये ठेवले आहेत. या लक्ष्यास सन २०१९ पर्यंत गाठायचे आहे. ज्या राज्यांतून गंगा नदी वाहते त्या राज्यांना यात सामील करण्यात आले आहे. ती राज्ये पुढीलप्रमाणे: उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, दिल्ली केंद्रशासित.

या कामासाठी सुमारे २३१ उपयोजना सुरू करण्यात आल्या आहेत.

संदर्भ संपादन

बाह्य दुवे संपादन