धैर्यशील पाटील
धैर्यशील मोहन पाटील हे एक भारतीय राजकारणी आहेत. हे ऑगस्ट २०२४ पासून महाराष्ट्रातून राज्यसभा सदस्य म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी हे २००९-२०१९ दरम्यान पेण मतदारसंघातून महाराष्ट्राच्या विधानसभेवर निवडून गेले होते. [१]
पाटील यांचा जन्म १९७१ रोजी पेण येथे झाला. त्यांचे वडील मोहन महादेव पाटील शेतकरी आणि कामगार पक्षाचे नेते होते आणि महाराष्ट्राचे राज्यमंत्री होते. हे १९८०-२००४ असे सतत २४ वर्षे पेणचे आमदार होते. [२]
धैर्यशील पेणमधील एका खाजगी हायस्कूल मध्ये शिकले. त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठात शिक्षण घेतले. १९९१ मध्ये त्यांनी भारती विद्यापीठात सिव्हिल इंजिनियरिंगचा डिप्लोमा केला. [३]
संदर्भ
संपादन- ^ "BJP names Dhairyasheel Patil as candidate for RS seat". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2024-08-20. 2024-09-03 रोजी पाहिले.
- ^ PTI (2014-07-24). "Former Maharashtra Minister Mohan Patil Passes Away". The New Indian Express (इंग्रजी भाषेत). 2024-09-03 रोजी पाहिले.
- ^ "Dhairyashil Mohan Patil(Peasants And Workers Party of India):Constituency- PEN(RAIGAD) - Affidavit Information of Candidate". www.myneta.info. 2024-09-03 रोजी पाहिले.