धामणसे
धामणसे (भारत- महाराष्ट्र- कोकण- रत्नागिरी जिल्हा- रत्नागिरी तालुका- धामणसे गांव) अरबी समुद्रापासून ४ कोसांवर पूर्वेकडे हे गाव वसलेले आहे.
?धामणसे महाराष्ट्र • भारत | |
— गावमहाराष्ट्र- — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | रत्नागिरी |
जिल्हा | रत्नागिरी जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
मराठी | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/०८ |
धामणसे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.
इतिहास
संपादनमंदिरे
संपादनकसबा धामणसे हे प्राचीन काळापासून आपले महत्त्व जपून आहे. येथे स्वयंभू कुलस्वामी श्री रत्नेश्वर हे प्राचीन मंदिर आहे. ८४ गावांचा कुलस्वामी म्हणून ज्याची ओळख आहे असा स्वयंभू देव इथे वास्तव्य करून आहे. देवरुखे ( देवर्षी) ब्राह्मण समुदायाचा हा कुलस्वामी असल्याने देश विदेशातून ज्ञाती चे लोक दर्शनासाठी इथे गर्दी करत असतात. त्याच प्रमाणे हेच येथील ग्रामदैवत सुद्धा आहे. त्यामूळे गावातील लोक सण उत्सवात येथे भक्तांची रीघ लागलेली असते. या मंदिरास सुमारे १३ व्या शतकापासून चा इतिहास आहे. देवर्षी समुदाय ची आद्य वसाहत धामणसे ही मानली जाते त्यामूळे त्या काळापासून इथे नियमित देवाचे पूजन अर्चन होत आहे. हे मंदिर दुर्मिळ वास्तू रचनेचा नमुना आहे असे म्हणावयास हरकत नाही कारण भारतात केवळ 3 मंदिरे दक्षिणाभिमुख आहेत त्यातील हे एक आहे, येथे नंदी अथवा पार्वती नाही. येथे केवळ दर्शन सेवेने मोक्ष प्राप्ती होते असा भक्तांचा विश्वास आहे. मृत्यू दिशेवर विजय मिळवणारे असे हे अत्यंत जागृत स्थान आहे. सोमगंगा नदीच्या काठी असणारे हे मंदिर भक्तांचे श्रद्धास्थान आहे. याच देवळात श्री रवळनाथ, श्री महालक्ष्मी, श्री चंडिका, श्री वाघजाई, श्री त्रिमुखी आदी देव विराजमान आहेत त्याच प्रमाणे गावात मानाई मंदिर,कालिका मंदिर, जाखमाता मंदिर, श्री दत्तगुरू देवस्थान, साई मंदिर, हनुमान मंदिर, बौद्ध समाज मंदिर अशी अनेक मंदिरे आहेत. गावातील भक्तजन एकोप्याने सर्व उत्सव व सण साजरे करते.
समाज रचना
संपादनकसबा धामणसे हे सुमारे ७०० वर्ष इतिहास असलेले गाव असून प्राचीन काळातील समाज रचना गावाच्या सद्य आखणीवरून करता येऊ शकते. बारा बलुतेदारी पद्धतीत हा गाव रचनाबद्ध केलेला आहे. त्यामूळे सर्व जातींचे वास्तव्य या गावात आहे. छत्रपती श्री शिवाजीराजे यांच्या राज्य कालावधीत काही काळ हा गाव आदिलशाही मुलुखात होता. त्यामूळे शिव दरबारात ह्या गावाची नोंद आहे. सरकारी पटलावरील कुळकर्णी पद या गावात होते. ब्रिटिश काळात खोतीने हा गाव विभागला होता. कुलकर्णी,जोशी,कानडे,देसाई असे चार समाज घटक समाजव्यवस्था चालवण्यासाठी नियुक्त होते. गावात ब्राह्मण समाज, मराठा समाज, सोनार समाज, लिंगायत समाज, सुतार समाज,तेली समाज,कुणबी समाज,चर्मकार समाज, बौद्ध समाज इत्यादी सर्व समाज वास्तव्य करून आहेत. सर्व जाती व्यवस्था सुशिक्षित व कर्तुत्वाने मोठ्या पदावर विराजमान आहे यातूनच गावातील एकता, बंधुता आणि समता याचे दर्शन इतर गावातील लोकांना होत आहे. प्राचीन काळात कसबा म्हणजेच प्रमुख ठिकाण असल्याने आजही धामणसे गाव त्याचं दर्जाने व मानाने अग्रस्थानी उभा आहे.
व्यवसाय्- (परंपरागत व सद्यस्थितित्)
संपादनगावचा परंपरागत मुख्य व्यवसाय हा शेती आहे. काळानुसार बदल होत असून शेतकरी वर्ग बागायतीकडे वळला आहे. गावात आंबा काजू नारळ सुपारी इत्यादी पिकांचे उत्पन्न घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे. उच्च शिक्षणामुळे अनेक विद्यार्थी बाहेरगावी व परदेशी आहेत. गावातील लोक गवंडी काम, कंत्राट कामे,चिरे खाण व्यवसाय, घर बांधणी अशा विविध व्यवसायात उतरून काम करत आहेत. फर्निचर बनविणे, वेल्डिंग, प्लुंबिंग इत्यादी कौशल्य आधारित व्यवसायांचे आकर्षण युवा पिढीला असून त्यातून रोजगार प्राप्ती ते करत आहेत.
राजकारण
संपादनदळणवळण
संपादनगावाच्या गरजा
संपादनभौगोलिक स्थान
संपादनहवामान
संपादनपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
संपादनप्रेक्षणीय स्थळे
संपादननागरी सुविधा
संपादनजवळपासची गावे
संपादनगावचा विस्तार मोठा असून पश्चिमेस नेवेरे,गणपतीपुळे उत्तरेस निवेंडी,चाफे, पूर्वेस ओरि , दक्षिणेस खरवते इत्यादी गावे आहेत
संदर्भ
संपादन१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/