धानोरा बुद्रुक (अहमदपूर)

धानोरा बुद्रुक हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील एक गाव आहे.

  ?धानोरा बुद्रुक

महाराष्ट्र • भारत
—  गाव  —
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ १,३५५.२६ चौ. किमी
जवळचे शहर अहमदपूर
जिल्हा लातूर जिल्हा
लोकसंख्या
घनता
३,२०२ (२०११)
• २/किमी
भाषा मराठी
सरपंच
बोलीभाषा
कोड
आरटीओ कोड

• एमएच/

भौगोलिक स्थान

संपादन

अहमदपूर ह्या तालुक्याच्या ठिकाणापासून हे गाव १४ कि.मी.अंतरावर आहे.लातूर हे जिल्ह्याचे ठिकाण ह्या गावापासून ६० कि.मी. अंतरावर आहे.

हवामान

संपादन

लोकजीवन

संपादन

सन २०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात ६९२ कुटुंबे राहतात.गावातील एकूण ३२०२ लोकसंख्येपैकी १६६७ पुरुष तर १५३५ महिला आहेत.गावात २१३७ शिक्षित तर १०६५ अशिक्षित लोक आहेत. त्यापैकी १२१३ पुरुष व ९२४ स्त्रिया शिक्षित तर ४५४ पुरुष व ६११ स्त्रिया अशिक्षित आहेत. गावाची साक्षरता ६६.७४ टक्के आहे.

प्रेक्षणीय स्थळे

संपादन

नागरी सुविधा

संपादन

जवळपासची गावे

संपादन

केंद्रेवाडी, सोनखेड, विळेगाव, व्होटाळा, मानखेड, सटाळा, हिप्परगा, पाटोदा, पारचंडा, टाकळगाव, नागठणा ही जवळपासची गावे आहेत.धानोरा बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये ही गावे येतात.[]

संदर्भ

संपादन
  1. https://villageinfo.in/
  2. https://www.census2011.co.in/
  3. http://tourism.gov.in/
  4. https://www.incredibleindia.org/
  5. https://www.india.gov.in/topics/travel-tourism
  6. https://www.mapsofindia.com/
  7. https://www.weather.gov/dvn/climategraphics?n=climategraphics
  8. https://www.weather-atlas.com/en/india-climate

भारतीय जनगणना २०११ नुसार माहिती

संपादन

या गावाची स्थान कोड संख्या (Location code number)] ५६०३१० आहे व लोकसंख्या ३२०२ आहे. त्यापैकी पुरुषांची संख्या १६६७ तर महिलांची संख्या १५३५ इतकी आहे. ० ते ६ या वयोगटातील पुरुषांची संख्या २०४ तर स्त्रियांची संख्या २०१ आहे. या गावातील घरांची एकूण संख्या ६९२ आहे. या गावातील एकूण लोकसंख्येपैकी २१३७ व्यक्ती या साक्षर आहेत तर यांपैकी १२१३ हे पुरुष आणि ९२४ स्त्रिया आहेत; १०६५ निरक्षर व्यक्तींमध्ये ४५४ पुरुष आणि ६११ स्त्रिया आहेत.[]

शैक्षणिक माहिती

संपादन

गावात पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाची सुविधा आहे. जिल्हा परिषदेची इयत्ता १ली ते ७ पर्यंतची शाळा आहे[] आणि इयत्ता ५ वी ते १० पर्यंत वसंत विद्यालय धानोरा (बु.) येथे शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहे.याच शाळांमधून शिकलेले काही विद्यार्थी पुढे उच्यविद्याविभूषित झाले आहेत सध्या त्यापैकी काहीजण परदेशांत संशोधन करत आहेत तर काहीजण विविध विद्यापीठात प्राध्यापक आहेत. इतर शिक्षक, अभियंते, डॉक्टर, सरकारी अधिकारी, खासगी कंपन्यात विविध पदांवर कार्यरत आहेत. खेड्यामध्ये शाळा असूनही येथील शिक्षणाचा दर्जा गुणवत्तापूर्ण आहे.

 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरा (बु.)चा समोरील बाजूचा फोटो ०५/०२/२०१७ रोजी सूर्यास्तावेळी.

मंदिर परिसर

संपादन

गावातील सर्व माणसांचे भेटण्याचे ठिकाण हे मंदिर परिसर आहे. गावातील बरेच निर्णय व्यवहार, एकमेकांच्या भेटीगाठी याच परिसरात होतात. मंदिर परिसरात हनुमान, विठ्ठल-रुक्मिणी, महादेव व दत्त मंदिर आहे यापैकी हनुमान मंदिर हे इतरांच्या तुलनेत अतिशय जुने मंदिर आहे. हनुमान मंदिराच्या मागे एक पिंपळाचे अतिशय जुने झाड आहे. सारे गावकरी बैलपोळ्याचा सण याच मंदिरांभोवती अतिशय उत्साहाने, आनंदाने साजरा करतात. ग्रामपंचायतीच्या ग्रामसभा, विविध कार्यक्रम हे याच मंदिरात होतात. गावातील बस थांबण्याचे ठिकाणही हे मंदिर परिसर आहे. त्यामुळे गावाचा मंदिर परिसर हे या गावाचे एकप्रकारे वैचारिक, व्यावहारिक उलाढालीचे मध्यवर्ती ठिकाण म्हणायला काही हरकत नाही.

संदर्भ

संपादन