धाधरे
धाधरे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील उत्तर कोकणातील पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील एक गाव आहे.
?धाधरे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ | .७६४ चौ. किमी |
जवळचे शहर | वाडा |
जिल्हा | पालघर जिल्हा |
लोकसंख्या • घनता |
५६८ (२०११) • ७४३/किमी२ |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | वारली |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४२१३०३ • +०२५२६ • एमएच/४८ /०४ /०५ |
भौगोलिक स्थान
संपादनवाडा बस स्थानकापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८ ने जाऊन पुढे तिळसा मार्गाने गेल्यावर घाटळपाडा जिल्हा परिषदेच्या शाळेनंतर हे गाव लागते. वाडा बस स्थानकापासून हे गाव १५ किमी अंतरावर आहे.
हवामान
संपादनपावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व अनेकदा सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन
संपादनहे मध्यम आकाराचे लहान गाव आहे.२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार गावात १२८ कुटुंबे राहतात. एकूण ५६८ लोकसंख्येपैकी २९० पुरुष तर २७८ महिला आहेत. गावाची साक्षरता ६७.०९ टक्के आहे.पुरुष साक्षरता ८०.१७ आहे तर स्त्री साक्षरता ५३.२८ आहे. गावातील वय वर्ष शून्य ते सहा वर्षे लहान मुलांची संख्या ९७ आहे. ती एकूण लोकसंख्येच्या १७.०८ टक्के आहे. मुख्यतः आदिवासी व कुणबी समाजातील लोक येथे राहतात. कुणबी समाजाचा शेती हा मुख्य व्यवसाय असून आदिवासी समाज शेतमजूर, वीटभट्टीमजूर, कामगार म्हणून काम करतात. ते काही प्रमाणात कुक्कुटपालन, बकरीपालन सुद्धा करतात.
नागरी सुविधा
संपादनगावात प्राथमिक शिक्षण,प्राथमिक आरोग्यसेवा, रस्ते वीजपुरवठा, सार्वजनिक स्वच्छता,पाणी पुरवठा इत्यादी आवश्यक गोष्टी उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस वाडा बस स्थानकावरून येथे येण्यासाठी ठराविक वेळी उपलब्ध असतात. रिक्षा सुद्धा वाड्यावरून उपलब्ध असतात.
जवळपासची गावे
संपादनपरळी, ओगाडा, फणसगाव, खोदाडे, तिळमाळ, कोलीमसरोवर, शेळे, धापड, कळंभोळी, बाळिवळी, कासघर ही जवळपासची गावे आहेत.शेळे ग्रामपंचायतीमध्ये धाधरे, धापड, कोलीमसरोवर, शेळे ही गावे येतात.
संदर्भ
संपादन१. https://www.census2011.co.in/data/subdistrict/4163-palghar-thane-maharashtra.html
२. https://villageinfo.in/maharashtra/thane/palghar.html
३. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/
५. http://districts.nic.in/districtsdetails.php?sid=MH&disid=MH036