द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो (२००२ चित्रपट)


द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो हा २००२मध्ये प्रदर्शित अमेरिकन ऐतिहासिक-काल्पनिकचित्रपट आहे. याची निर्मिती रॉजर बर्नबॉम, गॅरी बार्बर आणि जोनाथन ग्लिकमन यांनी केली तर केव्हिन रेनॉल्ड्स दिग्दर्शन केले. हा चित्रपट अलेक्झांडर ड्युमा यांच्या याच नावाच्या कादंबरीचे रूपांतर आहे . या चित्रपटात जिम कॅविझेल, गाय पियर्स, रिचर्ड हॅरिस, जेम्स फ्रेन, डाग्मारा डोमिंचिक आणि लुइस गुझमान यांनी भूमिका केल्या. या चित्रपटा कादंबरीच्या कथानकाचे साधारणपणे अनुसरण असले तरी मुख्य पात्रांमधील आंतरसंबंध आणि शेवट हे वेगळे आहेत. हा चित्रपट २५ जानेवरी, २००२ रोजी प्रदर्शित झाला आणि त्याने $७.५ कोटी कमावले.

द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो (२००२ चित्रपट)
संगीत एडवर्ड शिअर्मर
देश
भाषा इंग्लिश
प्रदर्शित २५ जानेवारी, २००२


गोझो येथील अझुर विंडो काही दृश्यांच्या पार्श्वभूमीवर दिसते. []

भूमिका

संपादन

निर्माण

संपादन

या चित्रपटाचे बव्हंश चित्रीकरण माल्टामध्ये झाले. मार्सेलच्या ऐवजी माल्टाची राजधानी व्हॅलेट्टाचे चित्रकरण आहे. व्हॅलेट्टाच्या ग्रँड हार्बरचा एक भाग असलेले व्हितोरिओसा हे तटबंदी असलेले शहर १९व्या शतकाच्या सुरुवातीच्या मार्सेल बंदरासारखेच दिसत असल्याने हे निवडले गेले. [] व्हितोरिओसाचे झात इर-रिस्क आणि फोर्ट सेंट एल्मो हे समुद्रकिनाऱ्यावरील भाग मार्सेलच्या दृष्यांमध्ये वापरले गेले आहेत. [] ग्रँड हार्बर हे जगातील सर्वात खोल बंदर असल्याने यूकेमधून शिडाच्या जुन्या आणि प्रचंड जहाजांनाही येथपर्यंत आणता आले. शॅटो डी'इफच्या ऐवजी कोमिनो बेटावरील सेंट मेरीज टॉवरचा वापर केला गेला होता. मॉन्टेक्रिस्टो बेटावरील दृष्यांमध्ये गोझोची अझुर विंडो देखील दिसते. [] []

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ Khomami, Nadia (8 March 2017). "'It's heartbreaking': Maltese mourn collapse of Azure Window arch". The Guardian. 8 March 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  2. ^ a b www.visitmalta.com. "Filming Locations". 2020-06-17 रोजी पाहिले.
  3. ^ Borg, Jean Pierre; Cauchi, Charlie (2015). World Film Locations: Malta. Intellect Books. ISBN 9781783204984.
  4. ^ Khomami, Nadia (8 March 2017). "'It's heartbreaking': Maltese mourn collapse of Azure Window arch". The Guardian. 8 March 2017 रोजी मूळ पान पासून संग्रहित.Khomami, Nadia (March 8, 2017).

बाह्य दुवे

संपादन