द ॲक्सिडेन्टल प्राइम मिनिस्टर

(द ऍक्सीडेन्टल प्राईम मिनिस्टर या पानावरून पुनर्निर्देशित)

द ॲक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर हा २०१९मध्ये प्रदर्शित हिंदी भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट याच नावाच्या संजय बारु यांनी लिहिलेल्या पुस्तकावर आधारित आहे.[] चित्रपटात अनुपम खेर यांची प्रमुख भूमिका असून हा चित्रपट ११ जानेवारी २०१९ला प्रदर्शित झाला. हा चित्रपट भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आहे.

द ॲक्सिडेन्टल प्राइम मिनिस्टर
दिग्दर्शन विजय रत्नाकर गुट्टे
निर्मिती सुनील बोहरा
धवल गडा
कथा विजय रत्नाकर गुट्टे
मयंक तिवारी
कार्ल दुन्ने
आदित्य सिन्हा
प्रमुख कलाकार अनुपम खेर
अक्षय खन्ना
सुझेन बर्नेट
आहाना कुमरा
संगीत सुदीप रॉय
साधु तिवारी
देश भारत ध्वज भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित {{{प्रदर्शन तारीख}}}


सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्याद्वारे ट्रेलरचा प्रचार केला.[] यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या प्रवक्त्याने हा चित्रपट ‘राजकीय प्रॉपगेंडा’ असल्याचे म्हणले.[] बिहारमधील स्थानिक न्यायालयाने 8 जानेवारी 2019 रोजी अनुपम खेर आणि चित्रपटाशी संबंधित तेरा जणांविरुद्ध राजकीय नेत्यांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले.[]

कलाकार व त्यांच्या भूमिका

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "The Accidental Prime Minister first look: Anupam Kher 'overwhelmed' with response, writes personal thanks". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2017-06-08. 2022-01-18 रोजी पाहिले.
  2. ^ "BJP shares The Accidental Prime Minister's trailer on Twitter, draws flak online". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2018-12-28. 2022-01-18 रोजी पाहिले.
  3. ^ "The Accidental Prime Minister trailer stirs up political storm; Congress demands private screening prior to release-Politics News , Firstpost". Firstpost (इंग्रजी भाषेत). 2018-12-28. 2022-01-18 रोजी पाहिले.
  4. ^ "Bihar Court Orders FIR Against Anupam Kher and 13 Others For The Accidental Prime Minister". News18 (इंग्रजी भाषेत). 2022-01-18 रोजी पाहिले.