द इंपेरियल (नवी दिल्ली)
द इंपेरियल हे भारताची राजधानी नवी दिल्लीमधील पहिलेच ऐषआरामी व आलिशान हॉटेल आहे.[१][२][३] हे हॉटेल १९३१ साली कनॉट या ठिकाणाजवळ क्वीन्सवे, म्हणजेच आताचे जनपथ, येथे बांधण्यात आले.
दिल्ली मधील ब्रिटिश वसाहतीच्या काळातील आणि स्वातंत्रप्राप्तीच्या काळातील दुर्मिळ आणि कलात्मक वस्तूंचा खूप मोठा संग्रह या ठिकाणी पहायला उपलब्ध करून दिलेला आहे. एक उत्कृष्ट संग्रहालय आणि कला दालन या ठिकाणी आहे.[४]
इतिहास
संपादननवी दिल्ली सारख्या ठिकाणी भव्य दिव्य स्मारक उभे राहावे या ब्रिटिशांच्या इच्छेखातर १९३१ मध्ये व्हिक्टोरीयन आणि ब्रिटीशकालीन वास्तुशास्त्रानुसार डी.जे.ब्लोमफिल्ड या वास्तुविशारदाने एडविन ल्युटिन्स याच्या सहकार्याने आर्ट डिको पद्धतीने हे हॉटेल बांधले आहे. याच जोडगोळीने बिटिश राज्याची नवीन राजधानी - नवी दिल्लीचा आराखडा तयार केला होता. त्याचे उद्घाटन त्याच वर्षी करण्यात आले होते. १९११ मध्ये भारताची राजधानी कलकत्त्यावरून नवी दिल्ली केल्याचे घोषित करण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या राज्याभिषेक दरबारामध्ये आर.बी.एस.नरेन सिंग यांचा सत्कार ब्रिटीशांकडून करण्यात आला होता. त्यांचे सुपूत्र एस.बी.एस.रणजीत सिंग यांनी हे हॉटेल बांधले होते.[५]
१९९६ आणि २००१ मध्ये या हॉटेलचे व्यवस्थापक आणि उपाध्यक्ष हरविंदर सेखॉन यांनी या हॉटेलची पुर्नबांधणी केलेली आहे. त्यांच्या काळामध्ये या हॉटेलमध्ये नेदरलॅण्डची महाराणी, अनेक हॉलिवुडचे अभिनेता आणि अभिनेत्री यांनी, अनेक साहसी आणि श्रीमंत व्यक्तींनी पाहुणचार घेतलेला आहे. त्यांनी 'स्पाईस रूट', 'पटीयाला पेग बार', '१९११ रेस्टॉरंट आणि बार', 'डेनिअल्स टॅर्व्हन' आणि 'सन गिमिगनॅनो' अशी ६ रेस्टॉरंट आणि बार सुरू केले. कृपया 'न्यू दिल्ली हॉटेलची दारे कलेसाठी खुली, लॉस एजेंल्स टाईम्स, डिसेंबर ७, १९९७, असोसिएटेड प्रेस' आणि 'ट्रेव्हर फिशलोक यांचे भारत : फिशलोक्स एम्पायर', डेलि टेलिग्राफ, लंडन, २७ नोव्हेंबर २०००. यांमधील संदर्भ पहावा.
ऐतिहासिक वारसा
संपादनन्यू दिल्ली येथे असेलेले हे हॉटेल ऐतिहासिक दृष्टया अत्यंत महत्त्वाचे आहे. यामध्ये 'पटीयाला पेग' या नावाने ओळखले जाणारे मदयगृह आहे. याच ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, महम्मद अली जिना आणि लॉर्ड माऊंटबॅटन हे भारताची फाळणी आणि पाकिस्तानची निर्मिती या विषयावर चर्चा करण्यासाठी एकत्र जमले हाते. अलिगढ येथील एका शाळेला सुद्धा या हॉटेलचे नाव देण्यात आलेले आहे.
मान, सन्मान आणि पुरस्कार
संपादनया हॉटेलला २०१२ करीताचा ‘ट्रिप सल्लागार २०१२’चे उत्कृष्ट प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे. तसेच अमेरीकेने जगभरातील ५०० सर्वोत्कृष्ट हॉटेलमधून या हॉटेलला प्रवास आणि ऐषआराम या दोघांच्या दृष्टीने प्रथम क्रमांक देऊन गौरविलेले आहे. याशिवाय भारतामध्ये जगामधील सर्वांत आलिशान हॉटेल म्हणून २०११ मध्ये पुरस्कार देऊन गौरविलेले आहे.[६]
१६० खोल्या आणि ४५ कक्षांमध्ये असलेली प्रसाधनगृहे संगमरवरी दगड वापरून बांधलेली आहेत. २००८ मध्ये एलिटी प्रवासी कंपनीने या हॉटेलमधील रॉयल कक्षाला आशिया / पॅसिफिक प्रभागातून सर्वोक्तृष्ट कक्ष म्हणून गौरविलेले आहे.
आणखी वाचा
संपादन- विल्यम वॉरेन, जिल गोचर (२००७). आशियातील सुप्रसिद्ध हॉटेल्स : रोमांचकारी प्रवास. सिंगापूर : पेरीप्लस एडीशन. आयएसबीएन ९७८-०-७९४६-०१७४-४.
- किम इंग्लीस, जॅकेाब तेरमासेन, पाय मारी मोलबेच (२००४). कूल हॉटेल्स : भारत, मालदीव, श्री लंका. सिंगापूर: पेरीप्लस एडीशन, आयएसबीएन ०-७९४६-०१७३-१.
संदर्भ
संपादन- ^ "द इंपेरियल, न्यू दिल्ली" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "सुप्रसिद्ध हॉटेल : इंपेरियल नवी दिल्ली - बांधणी" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "दिल्ली येथील आलिशान हॉटेल" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
- ^ द इंपेरियल दिल्ली, पॅट्रिक होर्टन, रिचर्ड प्लंकेट, हयू फिनले. लोनली प्लॅनेट, 2002. आयएसबीएन १-८६४५०-२९७-५. पृ.क्र. २५०.
- ^ ग्रेट, गॅंण्ड, आणि फेमस हॉटेल, फ्रित्झ गबलर, रॉयन जीन. प्रकाशक. ग्रेट, गॅंण्ड, आणि फेमस हॉटेल आयएसबीएन ०-९८०४६६७-०-९.p. २५०.
- ^ "मान, सन्मान आणि पुरस्कार" (इंग्लिश भाषेत). 2014-02-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-02-07 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)