द ॲक्सिडेन्टल प्राइम मिनिस्टर
(द अॅक्सिडेन्टल प्राइम मिनिस्टर या पानावरून पुनर्निर्देशित)
द ॲक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर हा २०१९मध्ये प्रदर्शित हिंदी भाषेतील चित्रपट आहे. हा चित्रपट याच नावाच्या संजय बारु यांनी लिहिलेल्या पुस्तकावर आधारित आहे.[१] चित्रपटात अनुपम खेर यांची प्रमुख भूमिका असून हा चित्रपट ११ जानेवारी २०१९ला प्रदर्शित झाला. हा चित्रपट भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आहे.
द ॲक्सिडेन्टल प्राइम मिनिस्टर | |
---|---|
दिग्दर्शन | विजय रत्नाकर गुट्टे |
निर्मिती |
सुनील बोहरा धवल गडा |
कथा |
विजय रत्नाकर गुट्टे मयंक तिवारी कार्ल दुन्ने आदित्य सिन्हा |
प्रमुख कलाकार |
अनुपम खेर अक्षय खन्ना सुझेन बर्नेट आहाना कुमरा |
संगीत |
सुदीप रॉय साधु तिवारी |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | {{{प्रदर्शन तारीख}}} |
सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्याद्वारे ट्रेलरचा प्रचार केला.[२] यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसच्या प्रवक्त्याने हा चित्रपट ‘राजकीय प्रॉपगेंडा’ असल्याचे म्हणले.[३] बिहारमधील स्थानिक न्यायालयाने 8 जानेवारी 2019 रोजी अनुपम खेर आणि चित्रपटाशी संबंधित तेरा जणांविरुद्ध राजकीय नेत्यांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले.[४]
कलाकार व त्यांच्या भूमिका
संपादन- अनुपम खेर – डॉ. मनमोहनसिंग, भारताचे २००४-२०१४ दरम्यानचे पंतप्रधान
- सुझेन बर्नेट – सोनिया गांधी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा
- अर्जुन माथूर – राहुल गांधी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे वर्तमान अध्यक्ष
- आहाना कुमरा – प्रियांका रॉबर्ट वड्रा, सोनिया गांधी यांच्या कन्या व राहुल गांधी यांच्या भगिनी
- अब्दुल कादिर आमिन – अजयसिंग
- विमल वर्मा – लालूप्रसाद यादव
- अवतर स्यानी – लालकृष्ण अडवाणी
- अनिल रस्तोगी – शिवराज पाटील
- अजित सतभाई – पी.व्ही. नरसिंंहराव, भारताचे पुर्व पंतप्रधान
- चित्रगुप्ता सिन्हा – पी.व्ही. रंगाराव, पी.व्ही. नरसिंम्हा राव यांचे पुत्र
- अक्षय खन्ना – संजया बरुआ, पंतप्रधानांचे मीडिया सल्लागार व या पुस्तकाचे लेखक
संदर्भ
संपादन- ^ "The Accidental Prime Minister first look: Anupam Kher 'overwhelmed' with response, writes personal thanks". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2017-06-08. 2022-01-18 रोजी पाहिले.
- ^ "BJP shares The Accidental Prime Minister's trailer on Twitter, draws flak online". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2018-12-28. 2022-01-18 रोजी पाहिले.
- ^ "The Accidental Prime Minister trailer stirs up political storm; Congress demands private screening prior to release-Politics News , Firstpost". Firstpost (इंग्रजी भाषेत). 2018-12-28. 2022-01-18 रोजी पाहिले.
- ^ "Bihar Court Orders FIR Against Anupam Kher and 13 Others For The Accidental Prime Minister". News18 (इंग्रजी भाषेत). 2022-01-18 रोजी पाहिले.