दत्तात्रेय शंकर सोमण

(द.शं. सोमण या पानावरून पुनर्निर्देशित)

दत्तात्रेय शंकर सोमण (८ मे, इ.स. १९३०[] - ९ ऑक्टोबर, इ.स. २०११; मुंबई, महाराष्ट्र) हे महाराष्ट्र पोलिसातले अधिकारी होते. सोमण इ.स. १९८५ ते इ.स. १९८७ या कालखंडात मुंबई पोलीसदलाचे आयुक्त होते, तर इ.स. १९८७ ते इ.स. १९८८ या कालखंडात महाराष्ट्र पोलीसदलाचे पोलीस महासंचालक होते[]. मुंबई पोलीसदलाच्या महासंचालकपदी असताना मुंबईतील माफिया टोळीचा डॉन वरदराजन मुदलियार याचे माफिया साम्राज्य मोडून काढण्यात पोलिसांना यश आले.

दत्तात्रेय शंकर सोमण
जन्म ८ मे, इ.स. १९३०
मृत्यू ९ ऑक्टोबर, इ.स. २०११
मुंबई, महाराष्ट्र
निवासस्थान मुंबई
राष्ट्रीयत्व मराठी, भारतीय
वांशिकत्व मराठी
नागरिकत्व भारतीय
पेशा पोलीस
मूळ गाव सोलापूर, महाराष्ट्र
पदवी हुद्दा महाराष्ट्र पोलीस महासंचालक (इ.स. १९८७-८८)
मुंबई पोलीस आयुक्त (इ.स. १९८५-८७)

सोमणांचे शिक्षण महाराष्ट्रात सोलापुरात झाले. भारतीय पोलीस सेवेच्या इ.स. १९५३ च्या तुकडीतून ते पोलीससेवेत दाखल झाले[].

इ.स. १९७०-८० च्या काळात मुंबईतील माफिया साम्राज्यावर वरदराजन टोळीची पकड होती. त्याला पुढे सोमण आणि वाय.सी. पवार जोडीने नामशेष केले[ संदर्भ हवा ]. सोमण पुढे पोलीस महासंचालक झाले.

पोलीसदलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आर्थिक गुन्हेगारी रोखण्यासाठी काय करता येईल याविषयी 'सेबी'ला सल्लागाराच्या भूमिकेत मदत केली. यामुळे 'सेबी' बळकट झाली आणि गुंतवणूकदारांना दिलासा देण्यात यशस्वी झाली. सोमण यांचे प्रशासकीय कौशल्य लक्षात घेऊन त्यांना मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त करण्यात आले. महापालिकेत त्यांच्या रूपाने पोलीस अधिकाऱ्याची नियुक्ती होणे, ही घटना बहुचर्चित बनली[ संदर्भ हवा ]. पालिकेच्या कारभारातही त्यांनी मोलाचे योगदान दिले.

संकीर्ण

संपादन

सोमणांनी आपला पोलीस नावाचे पुस्तक लिहिले आहे[].

संदर्भ

संपादन
  1. ^ "मि. डी.एस. सोमण" (इंग्लिश भाषेत). ३० ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ a b "मुंबईचे माजी पोलीस आयुक्त द. शं. सोमण यांचे निधन [[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". ३० ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); URL–wikilink conflict (सहाय्य)[permanent dead link]
  3. ^ "माजी पो.महासंचालक सोमण यांचे निधन". 2011-10-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ३० ऑक्टोबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)