द्वारकानाथ कोटणीस

मराठी-भारतीय डॉक्टर

डॉ. द्वारकानाथ कोटणीस (ऑक्टोबर १०, १९१० - डिसेंबर ९, १९४२) हे मराठी-भारतीय डॉक्टर होते. दुसर्‍या महायुद्धात जपानने चीनवर आक्रमण केलेले असताना डॉ. कोटणीस चीनला गेले होते. तेथे त्यांनी वैद्यकीय मोहिमेत भाग घेऊन चार वर्षे रुग्णसेवा केली. तेथेच डिसेंबर ९, १९४२ रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जीवनावर 'डॉक्टर कोटनीस की अमर कहानी' नावाचा एक हिंदी चित्रपट व्ही.शांताराम यांनी काढला होता.

द्वारकानाथ कोटणीस
A statue of Dwarkanath Kotnis.jpg
जन्म सोलापूर
१० ऑक्टोबर १९१०
मृत्यू ९ डिसेंबर १९४२
चीन
राष्ट्रीयत्व भारत ध्वज भारत
नागरिकत्व भारतीय
प्रशिक्षणसंस्था मुंबई विद्यापीठ
पेशा वैद्य
धर्म हिंदू


नॉर्मन बेथ्यून यांच्य स्मृतीस पुष्पचक्र समर्पिणारे द्वारकानाथ कोटणीस (चित्राचा काळ अज्ञात)


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.