द्राविड विद्या
द्राविड विद्या, अर्थात द्राविड शास्त्र, (इंग्लिश: Dravidian studies, द्रविडियन स्टडीज ;) हे द्राविड भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे अध्ययन करणारे अध्ययनक्षेत्र आहे. दक्षिण आशियाई अध्ययनशाखेत मोडणाऱ्या या अध्ययनक्षेत्रात तमिळ विद्या व अन्य शाखांचा अंतर्भाव होतो.
इतिहास
संपादनइ.स.च्या १६ ते १८ व्या शतकांदरम्यान तमिळ भाषेचे व्याकरण ग्रथणाऱ्या ऑन्रिकस ऑन्रिक, रोबेर्तो दि नोबिली, बार्थोलोमेउस त्सीगनबाल्ग, कोन्स्तांतिनो ज्युसेप बेशी इत्यादी ख्रिश्चन धर्मप्रसारकांच्या अभ्यासातून द्राविड विद्येच्या आरंभिक टप्प्यास सुरुवात झाली. भारतीय उपखंडातील इंडो-युरोपीय भाषासमूहापासून द्राविड भाषांचा समूह निराळा असल्याचे प्रतिपादन ब्रिटिश मद्रास प्रांताचा कलेक्टर फ्रान्सिस व्हाइट एलिस याने इ.स. १८१६ साली कॉलेज ऑफ सेंट जॉर्ज येथे पहिल्यांदा मांडले. तेव्हापासून द्राविड भाषा स्वतंत्र भाषासमूह म्हणून गणल्या जाऊ लागल्या.
वर्तमानकालीन उपक्रम
संपादनआंध्र प्रदेशातील कुप्पम येथे इ.स. १९९७ साली स्थापलेल्या द्राविड विद्यापीठात द्राविड विद्येतील पूर्वसुरी विद्वानांच्या नावाने प्रत्येक द्राविड भाषेशी संबंधित अध्ययनासाठी अध्यासने बनवण्यात आली आहेत : द्राविड विद्येसाठी बिशप काल्डवेल अध्यासन, तेलुगू विद्येसाठी सी.पी. ब्राउन अध्यासन, कन्नड विद्येसाठी किटेल अध्यासन, तमिळ विद्येसाठी कोन्स्तांतिनो बेशी अध्यासन आणि मल्याळम विद्येसाठी गुंडेर्ट अध्यासन [१].
संदर्भ
संपादन- ^ "द्रविडियन युनिवर्सिटी फेलोशिप्स" (इंग्लिश भाषेत). 2007-09-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-06-02 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
बाह्य दुवे
संपादन- नेदरलंड्सातील द्राविड विद्या, आयआयएएस वृत्तपत्रिका (इ.स. २००५) [१][२] (इंग्लिश मजकूर)
- तमिळ विद्येतील निवडक परदेशी विद्वानांचे साहित्यिक योगदान (इंग्लिश मजकूर)